विजय हजारे ट्रॉफी २०२१ ( Vijay Hazare Trophy 2021) स्पर्धेत धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. मुंबईच्या पृथ्वी शॉनं काही दिवसांपूर्वी द्विशतकी खेळी केली होती, तर मध्य प्रदेशच्या वेंकटेश अय्यरनं १९८ धावा कुटल्या होत्या. पंजाबच्या अभिषेक शर्मानं ( Abhishek Sharma) रविवारी झालेल्या सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध वादळी शतक झळकावले. अभिषेकनं ४२ चेंडूंत १०० धावा चोपल्या आणि त्यानं नव्या विक्रमाची नोंद केली. लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारताकडून हे सर्वात दुसरे वेगवाग शतक ठरले. पण, त्यानं सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांचा विक्रम मोडला. त्याचे हे शतक संघाला विजय मिळवून देण्यास पुरेसे ठरले नाही. विराट कोहलीनं हातात बॉटल असूनही रोहित शर्माला पाणी दिलं नाही; दोन स्टार खेळाडूंना सोबत पाहून नेटिझन्स सुटले
मध्य प्रदेशकडून मिळालेल्या ४०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डावखुरा फलंदाज अभिषेकनं आक्रमक खेळ केला. त्यानं ४९ चेंडूंत १०४ धावा केल्या. त्याच्या या शतकी खेळीत ९ षटकार व ८ चौकरांचा समावेश होता आणि त्याचा स्ट्राईक रेट हा २१२.२४ इतका होता. पण, त्याला अन्य खेळाडूंकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे पंजाबला १०५ धावांनी पराभव पत्करावा लागला. पंजाबचा संघ २९७ धावांवर तंबूत परतला. मध्य प्रदेशकडून वेंकटेश अय्यरनं १४६ चेंडूंत १९८ धावा केल्या. रोहित शर्मानं इंग्लंडची फिरकी घेण्याचा केला प्रयत्न, पत्नी रितिकाच्या कमेंटनं काढली 'हिटमॅन'ची विकेट
लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम काही दिवसांपूर्वी सूर्यकुमारनं नावावर केला होता. त्यानं ५० चेंडूंत शतक झळकावले होते. विराटनं २०१३ मध्ये ५२ चेंडूंत शतक पूर्ण केले होते. २००९-१०मध्ये युसूफ पठाणननं विजय हजारे ट्रॉफीत ४० चेंडूंत नाबाद १०८ धावा केल्या होत्या.
अभिषेक हा आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा सदस्य आहे. त्यानं १४ सामन्यांत १४३ धावा केल्या आहेत. २०१८च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता आणि राहुल द्रविड याच्याकडून त्यानं मार्गदर्शन घेतलं आहे.