Join us  

Sarfaraz Khan Hospitalised: सर्फराज खान हॉस्पिटलमध्ये दाखल, विजय हजारे ट्रॉफीतील पुढील सामन्यात खेळणार नाही?, जाणून घ्या अपडेट्स  

रांची - मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या सर्फराज खानला ( Sarfaraz Khan Hospitalised) विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेतील काही सामन्यांना मुकावे लागू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 12:25 PM

Open in App

रांची - मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या सर्फराज खानला ( Sarfaraz Khan Hospitalised) विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेतील काही सामन्यांना मुकावे लागू शकते. सर्फराज खानच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. विजय हजारे स्पर्धेच्या ग्रुप सामन्यांसाठी मुंबईचा संघ सध्या रांची येथे आहे. सर्फराज रविवारी सेनादलाविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही आणि मुंबईला पराभव पत्करावा लागला.

सर्फराजला किडनी स्टोनचा त्रास झाला आणि सोमवारी त्याला डिस्चार्जही दिला गेला. सर्फराजचे वडील नौशाद खान यांनी सांगितले की, ही खूप लहान समस्या होती, परंतु त्याचा त्रास खूप सहन करावा लागला. त्याला खूप आधीपासून हा त्रास होत होता. त्यामुळेच त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. आता तो ठीक आहे.   

मुंबईचा पुढील सामना महाराष्ट्रविरुद्ध आहे आणि सर्फराज या सामन्याला खेळणार आहे. त्याला केवळ एका दिवसासाठी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रहावे लागले. सर्फराज भारत अ संघासोबत बांगलादेश दौऱ्यावरही जाऊ शकतो. भारत अ संघ बांगलादेश दौऱ्यावर कसोटी व मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. 

सर्फराज खानने स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २९ सामन्यांत १० शतकं व ८ अर्धशतकांसह ८१.३३ च्या सरासरीने २९२८ धावा केल्या आहेत. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने २२ सामन्यांत ३२.५०च्या सरासरीने ३२५ धावा केल्या आहेत आणि त्यात एका शतकाचा समावेश आहे. ट्वेंटी-२०त ८४ सामन्यांत १०७१ धावा त्याच्या नावावर आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"       

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रविजय हजारे करंडक
Open in App