चेन्नई - तामिळनाडूच्या संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० षटकांमध्ये २ बाद ५०६ धावा ठोकून एका मोठ्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या लढतीत नारायण जगदिशन (२७७) आणि साई सुदर्शन (१५४) यांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर तामिळनाडूने पाचशेपार मजल मारली. लिस्ट ए एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा तामिळनाडू हा जगातील पहिला संघ ठरला आहे.
या विक्रमाबरोबरच तामिळनाडूने एकदिवसीय क्रिकेटमधील इंग्लंडचा विश्वविक्रम मोडित काढला आहे. इंग्लंडच्या संघाने याचवर्षी जून महिन्यात नेदरलँड्सविरोधात ५० षटकांत ४९८ धावा कुटल्या होत्या. तामिळनाडूने आज ५०६ धावा फटकावल्याने इंग्लंडच्या संघाचा विक्रम मोडित निघाला.
तामिळनाडूच्या संघाने प्रथम फलंदाजीस सुरुवात केल्यावर सलामीवीर साई सुदर्शन १०२ चेंडूत १५४ धावा आणि नारायण जगदिशन १४१ चेंडूत २७७ धावा यांनी तुफानी खेळी केली. या दोघांनीही ४१६ धावांची विक्रमी भागीदारी केली. २७७ धावांची खेळी करणाऱ्या जगदिशनने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांची धुलाई करताना २५ चौकार आणि १५ षटकार ठोकले.
५० षटकांत सर्वात मोठ्या धावसंख्या१ - तामिळनाडी २ बाद ५०६२ - इंग्लंड ६ बाद ४९८३ - सरे ४ बाद ४९६४ - इंग्लंड ४ बाद ४८१५ - भारत अ ४ बाद ४५८