Karun Nair Set New World Record In Vijay Hazare Trophy : देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या वनडे क्रिकेट स्पर्धेत विदर्भ संघाचे नेतृत्व करणाऱ्या करुण नायर याने नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये नाबाद सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम त्याने करून दाखवलाय. ३ जानेवारीला उत्तर प्रदेश विरुद्धच्या सामन्यात विदर्भ संघाकडून खेळताना सलग तिसरे शतक झळकावताना त्याने विश्व विक्रमाला गवसणी घातली.
सातत्यपूर्ण कामगिरीसह करुण नायरनं साधला मोठा डाव
उत्तर प्रदेशच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना विदर्भ संघासमोर ३०८ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना करुण नायर याने ११२ धावांची दमदार खेळी केली. या सामन्यात नायर चार सामन्यात पहिल्यांदा आउट झाला. बाद होण्याआधी त्याने यश राठोडच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. या सामन्यात नायरनं ७० धावांचा आकडा गाठताच सलग नाबाद खेळीसह लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५०० धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला,
जेम्स फ्रँकलिनला मागे टाकत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर करुण नायर याने २०१० मध्ये न्यूझीलंडच्या क्रिकेटरनं सेट केलेल्या वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण नाबाद खेळी करताना जेम्स फ्रँकलिन याने ५२७ धावांसह वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. करुण नायरनं चौथ्या सामन्यात बाद होण्याआधी ५४२ धावांसह न्यूझीलंडच्या क्रिकेटला मागे टाकले. लिस्ट ए क्रिकेटमध्ये विकेट न गमावता सर्वाधिक धावा करणारा क्रिकेट जगतातील तो खेळीसह सर्वाधिक धावा करणारा क्रिकेट जगतातील फलंदाजांच्या यादीत आता तो अव्वलस्थानी आहे. मागील ५ डावात त्याने फक्त एकदा विकेट गमावली आहे.
५ डावात फक्त एकदाच झाला बाद
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत जम्मू-काश्मीर विरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद ११२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर छत्तीसगड विरुद्ध त्याने नाबाद ४४ धावा केल्या. त्यानंतर नायरनं लागोपाठ शतके ठोकली. चंडीगढ विरुद्ध नाबाद १६३ धावांच्या खेळीनंतर तमिलनाडू विरुद्ध त्याच्या भात्यातून १११ धावांची खेळी आली होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेश विरुद्धच्या सामन्यात त्याने ११२ धावांची दमदार खेळी केली.
IPL मध्ये अनसोल्डचा टॅग
दोन हंगामात आयपीएल लिलावात अनसोल्डचा टॅग लागलेल्या या खेळाडूवर २०२५ च्या मेगा लिवात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं ५० लाख रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. २०१७-१८ च्या हंगामात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दरम्यान अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा हा खेळाडू पुन्हा एकदा दमदार कामगिरीनं लक्षवेधून घेताना दिसतोय.
Web Title: Vijay Hazare Trophy 2024-25 Karun Nair Set New World Record With Hit Third Consecutive Century Scoring Most List A Runs Without Being Dismissed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.