Join us

महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ! हरयाणा अन् कर्नाटक आमने-सामने! सेमीतील लढतींची सविस्तर माहिती एका क्लिकवर

 सेमी फायनलसंदर्भातील सविस्तर माहिती एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:30 IST

Open in App

 Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ हंगामातील सेमी फायनलमधील चार संघ ठरले आहेत. महाराष्ट्र, विदर्भ, कर्नाटक आणि हरयाणा या चार संघांना सेमी फायनलच तिकीट मिळाले आहे. देशांतर्गत वनडे स्पर्धेतील पहिली सेमी फायनल हरयाणा विरुद्ध कर्नाटक यांच्यात रंगणार आहे. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ अशी रंगत पाहायला मिळेल. इथं जाणून घेऊयात सेमी फायनल लढतींचा थरार कधी रंगणार? क्रिकेट चाहत्यांना या सामन्यांचा आनंद कसा घेता येईल यासंदर्भातील सविस्तर माहिती

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कधी अन् कुठं खेळवण्यात येणार सेमी फायनलच्या लढती?

विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेतील हरयाणा विरुद्ध कर्नाट यांच्यातील पहिला सेमी फायनल सामना बुधवारी १५ जानेवारीला बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ यांच्यातील दुसरा सेमी फायनल सामना १६ जानेवारीला याच मैदानात खेळवण्यात येईल. दोन्ही सामने त्या त्या दिवशी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होतील. १८ जानेवारीला फायनल खेळवण्यात येणार आहे.

क्रिकेट चाहत्यांना कुठं पाहता येतील हे सामने?

स्पोर्ट्स १८ या चॅनेलवर देशांतर्गत वनडे क्रिकेटचा थरार क्रिकेट चाहत्यांना घरबसल्या पाहता येईल. याशिवाय जिओ सिनेमा अ‍ॅप आणि वेब साइटवरही या सामन्याचा आनंद चाहत्यांना घेता येईल.

दोन्ही सेमी फायनल लढतीत या खेळाडूंवर असतील नजरा

सेमी फायनल लढतीत विदर्भ संघाकडून खेळणाऱ्या करुण नायरवर सर्वांच्या नजरा असतील. त्याने यंदाच्या हंगामात ६ सामन्यात ५ शतकांच्या मदतीने ६६४ धावा ठोकल्या आहेत. खास गोष्ट म्हणजे करूण नायर या स्पर्धेत फक्त एकदाच बाद झाला आहे. त्याच्याशिवाय कर्नाटकच्या ताफ्यातील मयंक अग्रवाल, महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड आणि मुकेश चौधरी आणि हरयाणाच्या संंघातील अंशुल कंबोज या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. 

टॅग्स :विजय हजारे करंडकहरयाणाकर्नाटकमहाराष्ट्रविदर्भ