Join us

Vijay Hazare Trophy : स्टार खेळाडूंचा भरणा; महिन्याभरात १३५ सामन्यांची मेजवानी? जाणून घ्या सविस्तर

 वनडे फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत  ३८ संघांचा समावेश आहे. भारतीय संघातील अनेक स्टार क्रिकेटर या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:49 IST

Open in App

Vijay Hazare Trophy 2024-25 : देशांतर्गत क्रिकेटमधील लोकप्रिय आणि प्रतिष्ठित अशा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा २१ डिसेंबर २०२४ ते १८ जानेवारी २०२५ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. प्रत्येकी ५०-५० षटकांच्या सामन्यांच्या अर्थात देशांतर्गत स्पर्धेतील  वनडे फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत  ३८ संघांचा समावेश आहे. भारतीय संघातील अनेक स्टार क्रिकेटर या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.  

महिन्याभरात १३५ सामने; अनेक स्टार खेळाडू उतरणार मैदानात

जवळपास महिनाभर चालणारी ही स्पर्धा राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. १७ वेगवेगळ्या ठिकाणी  या स्पर्धेतील १३५ सामने खेळवण्यात येतील. स्पर्धेत सहभागी संघांची पाच गटात विभागणी करण्यात आली असून ९ जानेवारी, २०२५ पासून या स्पर्धेतील बाद फेरीतील लढतींना सुरुवात होणार आहे.  आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दृष्टीने देखील भारतीय क्रिकेटर्ससाठी ही स्पर्धा खूपच महत्त्वपूर्ण असेल. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून कोण-कोणते खेळाडू टीम इंडियात एन्ट्री मारणार? ते पाहण्याजोगे असेल.  

कोणत्या गटात कोणता संघ?

गट अ (हरियाणा, गुजरात, उत्तराखंड, ओडिशा, झारखंड, गोवा, आसाम, मणिपूर) गट ब (राजस्थान, महाराष्ट्र, सेवा, रेल्वे, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, मेघालय, सिक्कीम)गट क (कर्नाटक, मुंबई, हैदराबाद, सौराष्ट्र, पंजाब, पाँडेचेरी, अरुणाचल प्रदेश, नागालँड)गट ड (तामिळनाडू, विदर्भ, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, मिझोराम)गट ई (बंगाल, केरळ, त्रिपुरा, मध्य प्रदेश, दिल्ली, बडोदा, बिहार).

कुठं पाहता येतील सामने?

विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ या हंगामातील सामने Sports18 नेटवर्क टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. याशिवाय जिओ सिनेमा आणि फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवरील स्ट्रीमिंगच्या माध्यमातून क्रिकेट चाहते या सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. 

 

टॅग्स :विजय हजारे करंडकभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ