विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत राजस्थानचा बॅटर अभिजीत तोमर याने तामिळनाडू विरुद्धच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये धमाकेदार शतक झळकावले आहे. लिस्ट ए क्रिकेटमधील त्याच्या भात्यातून निघालेली हे चौथे शतक आहे. राजस्थानचा हा फलंदाज आयपीएलमध्ये शाहरुख खानच्याकोलकाता नाईट रायडर्स संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. पण त्याला फक्त एका सामन्यातच संधी मिळाली. त्यानंतर तो आयपीएलमधून गायब झालाय. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा जलवा अजूनही कायम आहे, याची झलक विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील बडोद्याच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पाहायला मिळाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तामिळनाडूच्या गोलंदाजांची धुलाई, १२ चौकार अन् ४ षटकारासह साजरी केली सेंच्युरी
२९ वर्षीय फलंदाज अभिजीत तोमर हा राजस्थान संघाच्या डावाची सुरुवात करतो. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या या पठ्ठ्यानं बाद फेरीतील महत्त्वपूर्ण लढतीत १२५ चेंडूत १११ धावांची दमदार खेळी केली. आपल्या या शतकी खेळीत त्याने १२ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. तामिळनाडू गोलंदाजांची धुलाई करणारा हा भिडू आयपीएलमध्येही दिसला आहे. पण त्याला फारशी संधी मिळाली नाही.
IPL मध्ये KKR संघाकडून दिसला, पण...
२०२२ च्या हंगामात शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्स संघानं राजस्थानच्या या खेळाडूवर ४० लाख रुपयांची बोली लावली होती. तो या हंगामात संघाकडून एकमेव सामनाही खेळला. यात त्याने फक्त ४ धावा केल्या होत्या. पण एका मॅचनंतर केकेआरनं त्याला संधीच दिली नाही. देशांतर्गत क्रिकेमधील त्याचा जलवा पाहिल्यावर कोलकाता नाईट रायडर्संन चांगल्या खेळाडूवर डाव खेळला पण त्यांना या हिऱ्याची पारख करता आली नाही, असाच काहीसा सीन आता पाहायला मिळतोय.
लिस्ट ए क्रिकेटमधील चौथे शतक