पुणे - जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या अंकित बावणेच्या सलग दुसºया नेत्रदीपक शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बंगळुरू येथे रविवारी झालेल्या विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघावर ९४ धावांनी मात करताना विजयी हॅट्ट्रिक नोंदवली. फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव याने ५ बळी घेत विजयात निर्णायक योगदान दिले.प्रथम फलंदाजी करणाºया महाराष्ट्राने ५० षटकांत ५ बाद २८१ धावा उभारल्या. महाराष्ट्राकडून अंकित बावणेने सलग दुसºया शतकाची नोंद करताना १३८ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद १०० धावा केल्या. नौशाद शेखने ६० चेंडूंत ७ चौकार, २ षटकारांसह ६० व अक्षय पालकरने ३२ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांची खेळी केली. कर्णधार राहुल त्रिपाठीने ४८ चेंडूंत ४ चौकारांसह ३८ धावा केल्या. पंजाबकडून मनप्रीतसिंग गोनी व मयंक मार्कं डे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना महाराष्ट्राचे सलामीवीर जय पांडे (०) व ऋतुराज गायकवाड (१६) यांना पाचव्या षटकात धावफलकावर अवघ्या १८ धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर अंकित बावणेने प्रथम राहुल त्रिपाठी याच्याबरोबर तिसºया गड्यासाठी ७७ धावांची भागीदारी करीत डावाला आकार दिला. कर्नाटकविरुद्ध नाबाद १०४ धावांची खेळी करणाºया अंकितने आपली तीच लय कायम ठेवताना नौशाद शेख याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी ९६ आणि पालकर याला साथीला घेत नाबाद ९० धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राला भक्कम धावसंख्या उभारण्यात निर्णायक योगदान दिले. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ ४०.३ षटकांत १८७ धावांत कोसळला. पंजाबकडून शुभमान गिल याने सर्वाधिक ५ चौकारांसह ३६ धावा केल्या. मनन व्होराने २७, अभिषेक शर्मा व शरद लुम्बा यांनी प्रत्येकी २३ धावा केल्या. भारताचा शैलीदार फलंदाज युवराज संघ ६ धावांवर बाद झाला. महाराष्ट्राकडून सत्यजित बच्छावने ५४ धावांत ५ व शमशुझमा काझीने १७ धावांत २ गडी बाद केले.संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र : ५० षटकांत ५ बाद २८१ (अंकित बावणे नाबाद १००, नौशाद शेख ६०, अक्षय पालकर ४६, राहुल त्रिपाठी ३८. मनप्रीतसिंग २/४९, मयंक मार्कं डे २/४१).पंजाब : ४.२ षटकांत सर्व बाद १८७. (शुभमान गिल ३६, मनन व्होरा २७, अभिषेक शर्मा २३, शरद लुम्बा २३. सत्यजित बच्छाव ५/५४, शमशुझमा काझी २/१७, अनुपम संकलेचा १/३१).
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विजय हजारे करंडक : अंकितचे नाबाद शतक; महाराष्ट्राची विजयी हॅट्ट्रिक
विजय हजारे करंडक : अंकितचे नाबाद शतक; महाराष्ट्राची विजयी हॅट्ट्रिक
जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या अंकित बावणेच्या सलग दुसºया नेत्रदीपक शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बंगळुरू येथे रविवारी झालेल्या विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघावर ९४ धावांनी मात करताना विजयी हॅट्ट्रिक नोंदवली.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 1:49 AM