Vijay hazare trophy Baba Indrajith: सध्या विजय हजारे ट्रॉफीचा थरार सुरू आहे. उपांत्य सामन्यात हरियाणाने तामिळनाडूचा 63 धावांनी पराभव केला. हिमांशू राणाचे नाबाद शतक आणि अंशुल कंबोजच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर हरियाणाने आपली विजयी मोहीम कायम ठेवली आणि 13 डिसेंबर रोजी येथे पाच वेळा विजेत्या तामिळनाडूचा 63 धावांनी पराभव करुन विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
या सामन्यातील तामिळनाडूच्या बाबा इंद्रजितने (Baba Indrajith) 64 धावांची खेळी केली. त्याचा संघ हरला, पण बाबा इंद्रजीतची खेळी कायम स्मरणात राहील. याचे कारण म्हणजे, सामन्यादरम्यान ओठावर बॉल लागून त्याचा ओठ फाटला होता. फाटलेल्या ओठावर पट्टी बांधून बाबा इंद्रजीतने आपला खेळ सुरुच ठेवला. त्याची खेळी पाहून अनिल कुंबळेची आली. कुंबळेनेही वेस्ट इंडिजविरुद्धच्या अँटिग्वा कसोटीत जबडा तुटलेला असतानाही गोलंदाजी केली होती.
तोंडाला पट्टी बांधी खेळ सुरू ठेवलाबाबा इंद्रजीतला बॉल लागल्याने रक्तस्त्राव झाला, पण यानंतर त्याने तोंडावर पट्टी बांधून खेळी सुरु ठेवली. तो फलंदाजीला आला तेव्हा तामिळनाडूची धावसंख्या 54/2 होती. यानंतर त्याने संघाला 192 धावांपर्यंत नेले आणि 64 धावा काढऊन बाद झाला. जखमी असतानाही त्याने केलेल्या खेळीने सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.
सामन्याचा निकालप्रथम फलंदाजी करताना हरियाणाने 293/7 धावा केल्या, प्रत्युत्तरात तामिळनाडूचा संघ 47.1 षटकात 230 धावांवर ऑल आऊट झाला. वेगवान गोलंदाज कंबोजने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत 30 धावांत चार बळी घेतले. आता हरियाणाचा सामना गुरूवारी राजस्थान आणि कर्नाटक यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होणार असून, अंतिम सामना शनिवारी होणार आहे.
बाबा इंद्रजीत आणि बाबा अपराजित जुळे भाऊ बाबा इंद्रजित हा बाबा अपराजितचा जुळा भाऊ आहे. बाबा अपराजितने 2012 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या अंडर-19 विश्वचषकात चमकदार खेळ केला होता. भारताच्या अंडर-19 च्या विजेतेपदात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. बाबा इंद्रजीतने आतापर्यंत 66 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 51.85 च्या सरासरीने 4511 धावा केल्या आहेत. तर इंद्रजीतने 60 लिस्ट ए सामन्यांमध्ये 47.55 च्या सरासरीने 1617 धावा केल्या आहेत.