Join us  

Vijay Hazare Trophy : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची तुफान फटकेबाजी, २३ चेंडूत चोपल्या ९८ धावा

Vijay Hazare Trophy मुंबई इंडियन्सचे ( Mumbai Indians) चे खेळाडू सध्या विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare Trophy ) स्पर्धेत चौकार-षटकारांची आतषबाजी करताना दिसत आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: February 26, 2021 3:53 PM

Open in App

मुंबई इंडियन्सचे ( Mumbai Indians) चे खेळाडू सध्या विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare Trophy ) स्पर्धेत चौकार-षटकारांची आतषबाजी करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी फलंदाज इशान किशन ( Ishan Kishan) यानं १७३ धावांची वादळी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. आता MIच्या आणखी एका अष्टपैलू खेळाडूनं जलवा दाखवला आहे. त्यानं या स्पर्धेतील दुसरे शतक झळकावताना अवघ्या २३ चेंडूंत ९८ धावा कुटल्या. हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारत दौरा करत आहे, त्याला कसोटीत खेळण्याची संधी दिलेली नाही. तेच दुसरीकडे त्याचा भाऊ कृणाल पांड्या ( Krunal Pandya) विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy ) स्पर्धेत तुफान फटकेबाजी करत आहे.  यंदाची Asia Cup टीम इंडियाशिवाय होणार?; इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या निकालानंतर सर्व ठरणार

बडोदा ( Baroda ) संघाचा कर्णधार कृणाल पांड्यानं शुक्रवारी छत्तीसगड संघाविरुद्ध शतकी खेळी केली. त्यानं या स्पर्धेत ४ सामन्यांत २ शतकं ( १२७* व १३३*) आणि २ अर्धशतकं ( ७१ व ५५) झळकावली आहेत. शुक्रवारी छत्तीसगडविरुद्ध कृणालच्या नाबाद १३३ धावांच्या जोरावर बडोदानं ६ बाद ३३२ धावांचा डोंगर उभा केला. कृणालनं १०० चेंडूंत १३३ धावा केल्या आणि त्यापैकी ९८ धावा या २० चौकार व ३ षटकारांच्या  मदतीनं आल्या.  विष्णू सोलंकीनं ७८ आणि प्रदीप यादवनं ३२ धावा केल्या. कृणालचा फॉर्म पाहता त्याला इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी त्याला संधी मिळू शकते. संघांना तीन डाव खेळायला द्या; मायकेल वॉनची खेळपट्टीवर टीका अन् युवराज सिंगचे मानले आभार

11 sixes, 19 fours: मुंबई इंडियन्सच्या इशान किशनची फटकेबाजी; नोंदवली विक्रमी खेळीमध्य प्रदेश संघाविरुद्धच्या सामन्यात इशाननं ११ षटकार आणि १९ चौकारांची बरसात केली. इशानने ९४ चेंडूंत १७३ धावा केल्या. यापैकी ७१ धावा या अखेरच्या २० चेंडूंत कुटल्या होत्या. इशानच्या या खेळीच्या जोरावर झारखंडने ५० षटकांत ९ बाद ४२२ धावांचा डोंगर उभा केला होता. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. इशानने पहिल्या ५० धावांसाठी ४२ चेंडू खेळले. विराट सिंग (६८), सुमीत कुमार ( ५२) आणि अनुकूल रॉय ( ७२) यांनीही हात धुवून घेतले.  

टॅग्स :विजय हजारे करंडकक्रुणाल पांड्यामुंबई इंडियन्स