Join us

जा प्रभ'सिमरन' जा..! पंजाबसमोर महाराष्ट्राच्या ताफ्यातील CSK च्या भिडूचा 'भांगडा';अभिषेकही नाही टिकला

पंजाबच्या आघाडीच्या बॅटरसमोर महाराष्ट्राच्या ताफ्यातील गोलंदाज मुकेश चौधरीचा भांगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:53 IST

Open in App

विजय हजारे स्पर्धेतील चौथ्या क्वार्टर फायनल लढतीत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघासमोर अभिषेक शर्माच्या नेतृत्वाखालील पंजाबचा संघाची अवस्था एकदमच बिकट झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या  ताफ्यातील मुकेश चौधरी नावाच्या वाघाच्या भेदक माऱ्यासमोर पंजाबची तगडी बॅटिंग लाइनअप अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. बडोदा येथील कोटांबी स्टेडिमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना महाराष्ट्र संघानं निर्धारित ५० षटकात ६ बाद २७५ धावा करत पंजाबसमोर २२६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जा  प्रभ'सिमरन' जा...

या धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात एकदम खराब झाली. आयपीएल स्टार अन् टीम इंडियाकडून खेळणाऱ्या प्रभसिमरनच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला.संघाच्या धावफलकावर २५ धावा असताना मुकेश चौधरीनं एका अप्रतिम चेंडूवर त्याला क्लीन बोल्ड केले. अनकॅप्डन मुकेश चौधरी एवढ्यावर थांबला नाही. त्याने जा प्रभ'सिमरन' जा या तोऱ्यात महाराष्ट्र संघाला पहिली विकेट मिळवून दिली.

अभिषेक शर्मा पाठोपाठ नेहाल वढेराची विकेट घेत मोडला पंजाबच्या बॅटिंग ऑर्डरचा कणा

त्यानंतर अभिषेक शर्माच्या रुपात मोठा मासाही  मुकेश चौधरीनं आपल्या गळाला लावला. अभिषेक शर्मा १९ धावांवर झेलबाद झाला. नेहाल वढेराच्या रुपात मुकेशनं तिसरी विकेट घेत धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबच कंबरड मोडलं. त्याचा हा शो पंजाबसमोर भांगडा करून महाराष्ट्र संघाला सेमीत एन्ट्री करुन देण्यासाठी मोलाचा असाच आहे.  देशांतर्गत स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून खेळणारा म मुकेश चौधरी हा आयपीएलमध्येही ऋतुराजच्या नेतृत्वाखालील CSK च्या ताफ्यात आहे.

टॅग्स :विजय हजारे करंडक