रांची : फिरकीपटू तनुष कोटीयानच्या दमदार माऱ्याच्या जोरावर मुंबईने विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत बंगालवर आठ गड्यांनी मात केली. प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगालचा डाव मुंबईने ३१.३ षटकांत अवघ्या १२१ धावांत गुंडाळला. कोटीयानने ३१ गड्यांच्या मोबदल्यात ४ गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. तर शम्स मुलाणीने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात मुंबईने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ५९ धावांच्या जोरावर ३०.२ षटकांत विजयी लक्ष्य पूर्ण केले.दुसरीकडे ब गटाच्या सामन्यात दिल्लीने विदर्भावर पाच गड्यांनी विजय मिळविला. अनुभवी इशांत शर्माच्या (३ बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर दिल्लीने विदर्भाला २०७ धावांवर रोखले. त्यानंतर शिखर धवन (नाबाद ४७) आणि ललित यादव (नाबाद ५६) यांच्या दमदार फलंदाजीमुळे विजयी लक्ष्य सहज गाठले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विजय हजारे ट्रॉफी: मुंबईची बंगालवर मात
विजय हजारे ट्रॉफी: मुंबईची बंगालवर मात
Vijay Hazare Trophy: फिरकीपटू तनुष कोटीयानच्या दमदार माऱ्याच्या जोरावर मुंबईने विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत बंगालवर आठ गड्यांनी मात केली. प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगालचा डाव मुंबईने ३१.३ षटकांत अवघ्या १२१ धावांत गुंडाळला.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 5:37 AM