Vijay Hazare Trophy, Ruturaj Gaikwad century : चेन्नई सुपर किंग्सनंच आयपीएल २०२२ साठी संघात कायम राखून दाखवलेला विश्वास ऋतुराज गायकवाडनं ( Ruturaj Gaikwad) सार्थ ठरवला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर ऋतुराजनं विजय हजारे ट्रॉफी वन डे स्पर्धेत महाराष्ट्राला एकहाती विजय मिळवून दिला. मध्य प्रदेशविरुद्धच्या लढतीत ऋतुराजनं शतकी खळी करताना १८ चेंडूंत ८० धावा कुटल्या. महाराष्ट्रानं हा सामना ५ विकेट्स व २ चेंडू राखून जिंकला.
प्रत्युत्तरात कर्णधार ऋतुराज व यश नाहर यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यश ४९ धावांवर माघारी परतल्यानंतर नौशाद शेख ( ३४), राहुल त्रिपाठी ( ५६) यांनी ऋतुराजला चांगली साथ दिली. संघाला विजयासाठी ६० धावांची गरज असताना ऋतुराज बाद झाला. त्यानं ११२ चेंडूंत १४ चौकार व ४ षटकारांसह १३६ धावा केल्या. अंकित बावणे ( २४*) व स्वप्निल फुलपागर ( २२*) यांनी दमदार खेळ करताना महाराष्ट्राचा विजय पक्का केला. महाराष्ट्रानं ४९.४ षटकांत ५ बाद ३३० धावा करून विजय मिळवला.