ठाणे : विजय इंदप क्रिकेट अकॅडमी संघाने ठाणे शहर पोलीस क्रिकेट क्लब संघाचा ४० धावांनी पराभव करत स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित ३६ व्या डॉ. श्रीधर देशपांडे स्मृती समर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
ठाणे शहर पोलीस संघाने नाणेफेक जिकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत विजय इंदप क्रिकेट अ कॅडमी संघाने प्रतिस्पर्ध्यासमोर १७५ धावांचे आव्हान उभे केले. सलामीवीर ओमकार रहाटेने अपेक्षेनुसार कामगीरी करताना ३६ चेंडूत कार चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने ४९ धाव केल्या. अश्विन माळीने ३५ धावांचे योगदान दिले. प्रणव यादवने २०, मदार चौधरीने १९ आणि योगेश पाटीलने १८ धावांची भर टाकली. हेमंत सोनावणे आणि सागर मिमरोटने प्रत्येकी तीन विकेट मिळवल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना ठाणे शहर पोलीस क्रिकेट क्लबचा डाव १९.४ षटकात १३४ धावा केल्या. प्रकाशश पाटीलने ३५, महेश ठाकरेने ३३ आणि चेतन भोईरने २४ धावा केल्या. गोलंदाजीतही छाप पाडताना अश्विन माळी आणि शीत रांभियाने प्रत्येकी दोन विकेट मिळवले. तर ओंमकार रहाटे, देविदास शेडगे, सचिन चव्हाण आणि स्वप्नील दळवीने प्रत्येकी एक विकेट मिळवली .
संक्षिप्त धावफलक : विजय इंदप क्रिकेट अकॅडमी : २० षटकात सर्वबाद १७५ (ओमकार रहाटे ४९, अश्विन माळी ३५, प्रणव यादव २०, मंदार चौधरी १९, योगेश पाटील १८, हेमंत सोनावणे ४-३९-३, सागर मिमरोट ४-२०-३, अमित सकपाळ ४-२९-२, पंकज परदेशी ४-१-२७-१) विजयी विरुद्ध ठाणे शहर पोलीस क्रिकेट क्लब : १९.४ षटकात सर्वबाद १३४ ( प्रकाश पाटील ३५,महेश ठाकरे ३३, चेतन भोईर २४ , अश्विन माळी ४-१९-२, शीत रांभिया ४-३२-२, ओमकार रहाटे ०.४ -७-१, देविदास शेडगे ३-१९-१, सचिन चव्हाण २-१५-१, स्वप्नील दळवी ४-२३-१).