नवरात्रापूर्वीच विजयाष्टमी; पहिल्या विजयाचे ‘भूत’ उतरविले

सामना संपताच भारताचा आसमंत आतषबाजीने उजळून निघाला. सामनावीर जसप्रीत बुमराहने टिच्चून गाेलंदाजी करत विजयाचा भक्कम पाया रचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 06:30 AM2023-10-15T06:30:44+5:302023-10-15T06:31:17+5:30

whatsapp join usJoin us
Vijayashtami just before Navratri; The 'ghost' of the first victory was dispelled india vs Pakistan Match | नवरात्रापूर्वीच विजयाष्टमी; पहिल्या विजयाचे ‘भूत’ उतरविले

नवरात्रापूर्वीच विजयाष्टमी; पहिल्या विजयाचे ‘भूत’ उतरविले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद : भारतीय क्रिकेट संघाने नवरात्रोत्सव सुरू हाेण्याआधीच विजयी घटस्थापना करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. यासह भारताने वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सलग आठव्यांदा पाकिस्तानला धूळ चारली आणि भारतीय चाहत्यांनी दसऱ्यापूर्वीच दिवाळी साजरी केली.

सामना संपताच भारताचा आसमंत आतषबाजीने उजळून निघाला. सामनावीर जसप्रीत बुमराहने टिच्चून गाेलंदाजी करत विजयाचा भक्कम पाया रचला. कर्णधार रोहित शर्माने त्यावर आक्रमक अर्धशतक  झळकावून विजयी कळस चढविला. 

सामन्यात काय घडले?
भारताने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला ४५.५ षटकांत १९१ धावांमध्ये गुंडाळले. 
हे लक्ष्य अवघ्या ३०.३ षटकांत ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १९२ धावा करून लिलया पार केले. 

सामन्यातील विक्रम 
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० षटकार पूर्ण करणारा रोहित शर्मा हा शाहिद आफ्रिदी आणि ख्रिस गेल यांच्यानंतरचा केवळ तिसरा फलंदाज ठरला.
विश्वचषक स्पर्धेतील एका सामन्यात पाच गोलंदाजांनी प्रत्येकी २ बळी घेण्याची तिसरी वेळ. यामध्ये भारताने दोन वेळा (२०११, २०२३) तर न्यूझीलंडने (२०१५) एकदा अशी कामगिरी केली आहे.
विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक ठोकणारा रोहित शर्मा हा मोहम्मद अझरुद्दीन (१९९९) व विराट कोहली (२०१९) यांच्यानंतरचा तिसरा भारतीय कर्णधार ठरला.

इथे फिरला सामना
२ बाद १५५ धावसंख्या असताना माेहम्मद सिराजने तिसाव्या षटकात बाबर आझमचा त्रिफळा उडवला. तिथून सामना फिरला.
त्यानंतरच्या ४ षटकांमध्ये साैद शकिल, इफ्तिकार अहमद आणि माेहम्मद रिझवान अवघ्या १३ धावांच्या अंतरात बाद झाले.
माेक्याच्या क्षणी सिराज, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी पाकिस्तानची मधली फळी उद्ध्वस्त केली.
अवघ्या ३६ धावांमध्ये ८ फलंदाज तंबूत परतले. त्यामुळे पाकिस्तानला पूर्ण ५० षटके खेळून काढणे साेडाच, २०० धावांचा टप्पाही पार करता आला नाही.

Web Title: Vijayashtami just before Navratri; The 'ghost' of the first victory was dispelled india vs Pakistan Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.