चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात रविवारी ईडन गार्डन येथे झालेला सामना आयपीएलच्या इतिहासात नोंदला गेेला. कारण धोनीच्या संघाने या सामन्यात विक्रमांची आरास रचली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ४ बाद २३५ धावांचा डोंगर उभारला होता. आयपीएलच्या इतिहासातली ही सातव्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी धावसंख्या ठरली. तसेच एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या संघांमध्ये चेन्नईने सहावे स्थान गाठले आहे. याव्यतिरिक्त काही वैयक्तिक विक्रमांवरसुद्धा चेन्नईने रविवारच्या सामन्यात आपली मोहोर उमटवली.
आयपीएलमधील सर्वाधिक मोठ्या धावसंख्या
संघ धावसंख्या प्रतिस्पर्धी स्थान/तारीख
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ५ बाद २६३ पुणे वॉरिअर्स बंगळुरू, २३ एप्रिल २०१३
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ३ बाद २४८ गुजरात लायन्स बंगळुरू, १४ मे २०१६
चेन्नई सुपरकिंग्ज ५ बाद २४६ राजस्थान रॉयल्स चेन्नई, ३ एप्रिल २०१०
कोलकाता नाइट रायडर्स ६ बाद २४५ किंग्स इलेव्हन पंजाब इंदूर, १२ मे २०१८
चेन्नई सुपरकिंग्ज ५ बाद २४० किंग्स इलेव्हन पंजाब मोहाली, १९ एप्रिल २००८
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १ बाद २३५ मुंबई इंडियन्स मुंबई, १० मे २०१५
चेन्नई सुपरकिंग्ज ४ बाद २३५ कोलकाता नाइट रायडर्स कोलकाता, २३ एप्रिल २०२३
एका डावात सर्वाधिक षटकार
२१ - बंगळुरू विरुद्ध पुणे, २०१३
२० - दिल्ली विरुद्ध गुजरात, २०१७
२० - बंगळुरू विरुद्ध गुजरात, २०१६
१८ - राजस्थान विरुद्ध पंजाब, २०२०
१८ - बंगळुरू विरुद्ध पंजाब, २०१५
१८ - चेन्नई विरुद्ध कोलकाता, २०२३
Web Title: Vikram's 'Superkings'; Many records of CSK under the leadership of Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.