Join us  

विक्रमांचे ‘सुपरकिंग्ज’; धोनीच्या नेतृत्त्वात सीएसकेचे अनेक विक्रम

आयपीएलमधील सर्वाधिक मोठ्या धावसंख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 8:07 AM

Open in App

चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात रविवारी ईडन गार्डन येथे झालेला सामना आयपीएलच्या इतिहासात नोंदला गेेला. कारण धोनीच्या संघाने या सामन्यात विक्रमांची आरास रचली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ४ बाद २३५ धावांचा डोंगर उभारला होता. आयपीएलच्या इतिहासातली ही सातव्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी धावसंख्या ठरली. तसेच एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या संघांमध्ये चेन्नईने सहावे स्थान गाठले आहे. याव्यतिरिक्त काही वैयक्तिक विक्रमांवरसुद्धा चेन्नईने रविवारच्या सामन्यात आपली मोहोर उमटवली.

आयपीएलमधील सर्वाधिक मोठ्या धावसंख्यासंघ                               धावसंख्या     प्रतिस्पर्धी              स्थान/तारीखरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू       ५ बाद २६३     पुणे वॉरिअर्स             बंगळुरू, २३ एप्रिल २०१३रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    ३ बाद २४८    गुजरात लायन्स          बंगळुरू, १४ मे २०१६चेन्नई सुपरकिंग्ज          ५ बाद २४६    राजस्थान रॉयल्स        चेन्नई, ३ एप्रिल २०१०कोलकाता नाइट रायडर्स     ६ बाद २४५     किंग्स इलेव्हन पंजाब       इंदूर, १२ मे २०१८चेन्नई सुपरकिंग्ज           ५ बाद २४०    किंग्स इलेव्हन पंजाब        मोहाली, १९ एप्रिल २००८रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू      १ बाद २३५    मुंबई इंडियन्स               मुंबई, १० मे २०१५चेन्नई सुपरकिंग्ज         ४ बाद २३५      कोलकाता नाइट रायडर्स    कोलकाता, २३ एप्रिल २०२३

एका डावात सर्वाधिक षटकार२१ - बंगळुरू विरुद्ध पुणे, २०१३२० - दिल्ली विरुद्ध गुजरात, २०१७२० - बंगळुरू विरुद्ध गुजरात, २०१६१८ - राजस्थान विरुद्ध पंजाब, २०२०१८ - बंगळुरू विरुद्ध पंजाब, २०१५१८ - चेन्नई विरुद्ध कोलकाता, २०२३ 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी
Open in App