कोरोना व्हायरसच्या संकटात हायलाईट्स पाहून कंटाळलेल्या क्रिकेट प्रेमींनी आज लाईव्ह सामन्याच थरार अनुभवला. दोन-अडीच महिन्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर लाईव्ह अॅक्शन पाहायला मिळालं. सेंट व्हिंसेंट अँड ग्रेनाडीन्स क्रिकेट असोसिएशनतर्फे विंसी प्रीमिअर लीगला आजपासून सुरुवात झाली. ग्रेनाडाईन डाव्हर्स आणि सॉल्ट पोंड ब्रेकर्स यांच्यात पहिला सामना खेळवण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन, विकेट गेल्यानंतर जल्लोष साजरा करण्याची अनोखी स्टाईल या सामन्यात पाहण्यात आली. या लीगमध्ये चेंडू चमकावण्यासाठी थूंकीचा वापर करण्यावर बंदी आहे.
22 ते 31 मे 2020 या कालावधीत विंसी प्रीमिअर लीग ( व्हिपीएल) T10 खेळवण्यात येणार आहे. कॅरेबियन बेटावरील आर्नोस व्हॅली स्पोर्टिंग कॉम्प्लेक्सवर या T10 लीगचे सामने खेळवण्यात येतील. या लीगमध्ये 6 संघांचा समावेश असलेली ही लीग इंडियन प्रीमिअर लीग आणि कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये 72 खेळाडूंचा सहभाग आहे. बोटनिक गार्डन रेंजर्स, ग्रेनाडाईन डाव्हर्स, सॉल्ट पोंड ब्रेकर्स, ला सौफ्रीएर हायकर्स, डार्क व्ह्यू एक्स्पोरर आणि फोर्ट चार्लोट स्ट्रायकर्स आदी सहा संघांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना ग्रेनाडाईन डाव्हर्स संघाला दहा षटकांत सर्वबाद 68 धावा करता आल्या. शेम ब्राऊन याने 14 चेडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचून सर्वाधिक 24 धावा केल्या. त्याला रोमॅनो पिएरे ( 14) यानं साथ दिली. अन्य फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सॉल्ट पोंड ब्रेकर्सच्या वेस्रीक स्टॉघनं 1 षटकात 7 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याला कर्णधार सुनील अॅम्ब्रीस आणि डॉनवेल हेक्टर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत चांगली साथ दिली. स्टॉघनं पहिल्या हॅटट्रिकचा मान पटकावला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर
टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या बहिणीचा भोजपुरी गाण्यावर डान्स, Video Viral
Cricket is Back; कॅरेबियन बेटावर आजपासून दहा दिवस रंगणार क्रिकेटचा थरार!
सुरेश रैना पाठोपाठ भारताच्या सलामीवीरानं मागितली परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी
आयपीएल 2020साठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा बळी? BCCI म्हणते...
Video : सहा वर्षाच्या पोरानं जगाला याड लावलंय; सिक्स पॅक अन् फुटबॉलला 3000 पेक्षा अधिक किक
.... तर IPL साठी देशांनी त्यांच्या खेळाडूंना पाठवू नये; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचे आवाहन