Rishabh Pant Sister Wedding, Dhoni Raina Pant Dance Video: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांची हजेरी लागल्याचे दिसले. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अनुभवी क्रिकेटपटू सुरेश रैना यांनी मंगळवारी डेहराडूनला पोहोचत लग्नसमारंभाच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. मंगळवारी हळदीचा समारंभ पार पडला. यावेळी पंत-धोनी-रैना या त्रिकूटाने धमाल मजामस्ती केली.
'दमा दम मस्त कलंदर' गाण्यावर डान्स
रिषभ पंतची बहीण साक्षी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांचे लग्नसोहळ्याचे विधी सुरू झाले आहेत. मंगळवारी 'हळदी' समारंभ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये भारतासाठी तीन वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी उपस्थित होता. तसेच, सुरेश रैना देखील सोबत दिसला. साक्षीच्या लग्नाशी संबंधित सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात सारेच धमाल मजा करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये धोनी, रैना आणि पंत 'दमा दम मस्त कलंदर' या प्रसिद्ध गाण्यावर नाचताना दिसत आहेत. चाहत्यांना ही स्टाईल खूप आवडत आहे. पाहा व्हिडीओ-
पंतची बहिण साक्षी हिचा पती कोण आहे?
पंतची बहीण साक्षी हिचा उद्योगपती अंकित चौधरीसोबत विवाह होणार आहे. अंकित हा लंडनमधील एका खाजगी कंपनीच्या संचालक मंडळावर आहे. दोघेही एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतात. अंकित आणि साक्षी यांचा गेल्या वर्षी जानेवारीमध्ये साखरपुडा झाला. या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक आणि खास मित्र यांनाच आमंत्रित करण्यात आले होते. आता लग्नालाही मोजक्याच निमंत्रितांची उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, पंत यंदा पहिल्यांदाच लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळणार आहे. त्याला फ्रँचायझीने २७ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तो यंदा लखनौचा कर्णधार असणार आहे.