भारतीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी कर्णधार आणि सर्वांचा लाडका क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी 39 वर्षांचा झाला आहे आणि विभिन्न पातळीवर त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत, पण त्याने नेहमीप्रमाणे सोशल मीडियाच्या झगमगाटापासून दूर राहण्यालाच पसंती दिली. जुलै 2019पासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे, परंतु त्याची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. सोशल मीडियावर त्याला शुभेच्छांचा वर्षाव झाला. कोरोना व्हायरसच्या संकटात धोनीनं कुटुंबीयांसोबतच वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. पण, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या, त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच आणि भाऊ कृणाल पांड्या हे थेट रांचीला पोहोचले.
विराट कोहली, रवी शास्त्री, युवराज सिंग, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी माहीला शुभेच्छा दिल्या. पांड्या बंधूंनी खासगी विमानानं थेट रांची गाठलं आणि धोनीचा वाढदिवस स्पेशल केला. सोशल मीडियावर हार्दिक, कृणाल आणि नताशा यांचा बिरसा मुंडा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ...
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.