Join us

Viral Video : 7 वर्षांच्या मुलीचा ‘Helicopter shot’ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीची चर्चा सुरू असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच धुमाकुळ घालत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 20:55 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीची चर्चा सुरू असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच धुमाकुळ घालत आहे. जुलै 2019नंतर कॅप्टन कूल धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी मध्ये जोर पकडला होता. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार कामगिरी करून धोनी टीम इंडियात पुनरागमन करेल, असेही तर्क लावण्यात आले. पण, कोरोना व्हायरसनं त्याही शक्यता मावळून टाकल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात आयपीएलवर अनिश्चिततेचं सावट आहे. अशात 7 वर्षांची चिमुरडी कॅप्टन कुलचा फेव्हरेट हॅलिकॉप्टर शॉट मारताना दिसत आहे.

युवराज सिंगच्या अडचणीत वाढ; 'त्या' विधानाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

धोनीच्या या आगळ्यावेगळ्या फटक्यानं अनेकांना भुरळ पाडली आहे. त्याचीच प्रचिती या 7 वर्षांच्या मुलीच्या व्हिडीओतून येत आहे. भल्याभल्यांना न जमलेला हा फटका ही मुलगी अगदी सहजतेनं मारताना दिसत आहे. परी शर्मा असे या मुलीचे नाव असल्याचे समजते.

पाहा व्हिडीओ...

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Big News : IPL 2020 भारताबाहेर होणार? BCCI करतेय विचार

मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही; गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर भारताचे कुस्तीपटू भडकले 

अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य

रिषभ पंतच्या आई आणि बहिणीवर युवकाकडून गंभीर आरोप, पोलिसांनी सुरू केला तपास 

आपण अजूनही रानटीच आहोत! गर्भवती हत्तीणीच्या हत्येचा रोहित, विराटसह क्रीडा विश्वातून तीव्र निषेध

Good News : 500 प्रेक्षकांच्या उपस्थितीत शनिवारपासून सुरू होणार ट्वेंटी-20 स्पर्धा 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसोशल व्हायरल