Join us  

पाकिस्तानची दुसऱ्या कसोटीतही अवस्था वाईट, पण फिल्डर मात्र नाचण्यात मग्न (Video)

पहिल्या कसोटी प्रमाणेच दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानी संघ अडचणीत सापडल्याचे दिसले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 9:55 PM

Open in App

Hasan Ali, Pak vs Aus Test: पहिल्या कसोटी प्रमाणेच दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानी संघ अडचणीत सापडल्याचे दिसले. खेळाच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाला २४१ धावांची आघाडी मिळवता आली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ६ बाद १८७ धावा केल्या. अशा परिस्थितीत पाकिस्तानला चौथ्या डावात लक्ष्य गाठणे सोपे जाणार नाही हे जवळपास निश्चित आहे. मेलबर्नमध्ये पराभूत झाल्यास मालिकाही गमवावी लागेल, हे स्पष्ट आहे. मात्र, असे असतानाही पाकिस्तानचा एक वरिष्ठ खेळाडू मैदानावर नाचताना दिसला.

पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली तिसऱ्या दिवशी असे काही करताना दिसला की ज्याचा ऑस्ट्रेलियन संघ आणि प्रेक्षकांनी खूप आनंद घेतला. हसन अली ५३व्या षटकात बाऊंड्री लाइनवर क्षेत्ररक्षण करत होता. यानंतर त्याने प्रेक्षकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आणि नंतर आपल्या शैलीत नृत्य करण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियन चाहतेही त्याचे अनुकरण करू लागले. त्यामुळे हसन अलीचा हा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला.

हसन अलीचा मैदानावरचा आनंद पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या चाहत्यांना आवडला नाही. त्याने या वेगवान गोलंदाजाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी तर हसन अली क्रिकेट सोडून बाकी सगळ्यात चांगला असल्याचे सांगत खिल्ली उडवली.

टॅग्स :पाकिस्तानसोशल मीडियासोशल व्हायरल