Viral Video : खेळपट्टीच्या मधोमध उभं राहून टाळा 'मांकड धावबाद', अजब युक्ती 

IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मांकड धावबाद सध्या चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 02:54 PM2019-04-09T14:54:22+5:302019-04-09T15:12:20+5:30

whatsapp join usJoin us
Viral Video: Standing in the middle of the pitch, Avoid 'Mankad Runout' | Viral Video : खेळपट्टीच्या मधोमध उभं राहून टाळा 'मांकड धावबाद', अजब युक्ती 

Viral Video : खेळपट्टीच्या मधोमध उभं राहून टाळा 'मांकड धावबाद', अजब युक्ती 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मांकड धावबाद सध्या चर्चेत आहे. आर अश्विन आणि जोस बटलर यांच्यातील या प्रकरणामुळे क्रिकेट विश्वाचीही दोन भागात विभागणी केली होती. काही जण अश्विनच्या बाजूनं होती, तर काही विरोधात. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात खेळपट्टीच्या मधोमध उभं राहून मांकड धावबाद टाळण्याबरोबरच धावा पूर्ण करण्याची अनोखी शक्कल लढवली आहे. 

एका स्थानिक सामन्यात नॉन स्ट्रायकर फलंदाजाने लांब दांड्याचा वापर केला आहे. त्यात हा फलंदाज खेळपट्टीच्या मधोमध उभा राहून दोन्ही एंडला दांड्याच्या साहाय्याने धावा पूर्ण करताना दिसत आहे. या अजब युक्तीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विचार झाल्यास मांकड धावबाद होण्यापासून रोखले जाऊ शकते. 

पाहा व्हिडीओ...


अश्विनकडून 'मांकड' बाद होण्यापासून वाचण्यासाठी वॉर्नरने लढवली शक्कल, Video
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विन आणि राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर यांच्यातील मांकड प्रकरण चांगलेच गाजले. अश्विनने मांकड नियमानुसार धावबाद करण्यापूर्वी बटलरला एक ताकीद द्यायला हवी होती, असा सल्ला अनेकांनी दिला. पण, अश्विनने आपण नियमाचे उल्लंघन न केल्याचा दावा केला. या प्रकरणानंतर अश्विनच्या गोलंदाजीवर नॉन स्ट्राईक एंडला असलेला प्रत्येक फलंदाज काळजी घेताना दिसत आहे. याची प्रचिती पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यातही आली. अश्विनला मांकड धावबाद करण्याची संधी मिळू नये यासाठी हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने चक्क एक शक्कल लढवली.



 

Web Title: Viral Video: Standing in the middle of the pitch, Avoid 'Mankad Runout'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.