Join us  

विराट-अनुष्काला पडली अलिबागची भुरळ, गणपतीच्या मुहूर्तावर केली जागेची खरेदी

Virat-Anushka: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, रवि शास्त्री, अजित आगरकर, रोहित शर्मा हे अलिबागच्या सौंदर्यात पडून अलिबागकर झाले आहेत. या दिग्गजांसोबत आता विराट कोहली ही अलिबागच्या सौंदर्यात हुरळून गेला असून, तोही गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागकर झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 6:52 AM

Open in App

अलिबाग : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, रवि शास्त्री, अजित आगरकर, रोहित शर्मा हे अलिबागच्या सौंदर्यात पडून अलिबागकर झाले आहेत. या दिग्गजांसोबत आता विराट कोहली ही अलिबागच्या सौंदर्यात हुरळून गेला असून, तोही गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागकर झाला आहे. विराटने झिराड येथे आठ एकर जागा घेतली असून, त्याठिकाणी तो फार्म हाऊस बांधणार आहे. विराटचा भाऊ विकास कोहली याने हा व्यवहार गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी मंगळवारी पूर्ण केला आहे. 

अलिबाग हा मुंबईला लागून असलेला निसर्गाने नटलेला तालुका आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यात अनेकजण दुसरे घर, फार्म हाऊससाठी पसंती देतात. क्रिकेटपटू, कलाकार, राजकीय नेते, उद्योजक हे अलिबागकर झाले आहेत. त्यामुळे अलिबाग हे दिग्गजांचे डेस्टिनेशन म्हणून उदयास येऊ लागले आहे. त्यात आता विराट आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचीही भर पडली आहे.

सहा महिन्यांपूर्वी विराट आणि पत्नी अनुष्का यांनी झिराड येथे येऊन जागेची पाहणी केली होती. क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमामुळे विराटला अलिबागमध्ये येऊन जागेचा व्यवहार पूर्ण करता येत नव्हता. सध्या तो आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी दुबईत आहे. त्यामुळे लहान भाऊ विकास याने ‘पॉवर ऑफ अटर्नी’द्वारे विराट कोहलीसाठी व्यवहार पूर्ण केला.

मोजले १९ कोटी २४ लाख ५० हजारझिराड येथील आठ एकर जमीन खरेदी-विक्रीची कागदपत्रे अलिबाग येथील सहदुय्यम निबंधक अश्विनी भगत यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आली आहेत. या जमिनीची एकूण किंमत १९ कोटी २४ लाख ५० हजार रुपये असून, यासाठी त्याने ३ लाख ३५ हजार रेडीरेकनरनुसार १ कोटी १५ लाख ४५ हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी सरकारच्या तिजोरीत जमा केली.

टॅग्स :अलिबागविराट कोहलीअनुष्का शर्मा
Open in App