विराट-अनुष्काची दक्षिण अफ्रिकेत शॉपिंग, सोशल मीडियाने घेतली मजा

केपटाऊनला पोहोचल्यानंतर नुकतंच लग्नात अडकलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत शॉपिंग करताना दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 10:43 AM2018-01-01T10:43:02+5:302018-01-01T10:55:57+5:30

whatsapp join usJoin us
Virat-Anushka's shopping in South Africa, trolled on social media | विराट-अनुष्काची दक्षिण अफ्रिकेत शॉपिंग, सोशल मीडियाने घेतली मजा

विराट-अनुष्काची दक्षिण अफ्रिकेत शॉपिंग, सोशल मीडियाने घेतली मजा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

केपटाऊन - भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण अफ्रिकेविरोधात होणा-या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी केपटाऊनला पोहोचला आहे. केपटाऊनला पोहोचल्यानंतर नुकतंच लग्नात अडकलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत शॉपिंग करताना दिसला. शुक्रवारपासून भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधीच अनुष्कासोबत वेळ घालवण्याच्या हेतूने विराट कोहलीने शॉपिंगसाठी थोडा वेळ काढला होता. विराट आणि अनुष्काचा शॉपिंग करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का एका दुकानाच्या बाहेर उभे आहेत जिथे 50 टक्के सेल सुरु आहे. 

या फोटोवरुन ट्विटर युजर्स विराट आणि अनुष्काची खिल्ली उडवत आहेत. विराट आणि अनुष्काचा फोटो शेअर करत एका युजरने कॅप्शन दिली आहे की, 'विराट - हे बघ अनुष्का मी 50 टक्के वाला नाही, 100 टक्के वाला आहे'. दुस-या एका युजरने लिहिलं आहे की, 'विराट कोहली वेडिंग प्लॅनरच्या बिलकडे पाहत असताना अनुष्का म्हणते चल शॉपिंगला जाऊ. विराट - मला माहितीये एक चांगली जागा'. एकाने लिहिलं आहे, 'विराटने अनुष्काला सांगितलं - रिसेप्शनवर एवढा खर्च केल्यानंतर आता सेलमध्येच शॉपिंग करावी लागणार डार्लिंग'.


विरुष्काचा 11 डिसेंबर रोजी इटलीमध्ये विवाहसोहळा पार पडला. या लग्नासाठी काही मोजक्या लोकांनाच आमंत्रण देण्यात आलं होतं, ज्यामध्ये काही मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. भारतात परतल्यानंतर दोघांनी दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. दिल्लीमधील रिसेप्शनला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते. मुंबईतील रिसेप्शनलाही क्रिकेटपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. 




 

भारतीय क्रिकेट संघ 56 दिवसांच्या दक्षिण अफ्रिका दौ-यावर आहे. दक्षिण अफ्रिकेत भारत तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 5 जानेवारीपासून होणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसी कसोटी फलंदाजांच्या मानांकनामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनंतर दुस-या स्थानी कायम आहे तर अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या लढतीत नाबाद द्विशतकी खेळी करणाºया अ‍ॅलिस्टर कूकने नऊ स्थानांची प्रगती करताना आठव्या स्थानी झेप घेतली आहे.
 

 

Web Title: Virat-Anushka's shopping in South Africa, trolled on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.