नवी दिल्ली : भारताचा कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली खेळाबरोबरच त्याच्या फिटनेसमुळेही प्रसिद्ध आहे. जगातील सगळ्यात फिट क्रिकटर्समध्ये विराटचं नाव मोजलं जातं. टीम इंडियाची विजयी घौडदोड सुरु असल्यानेच विराट सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. केवळ भारतात नाही, तर जागतिक स्तरावर विराट कोहलीची लोकप्रियता आहे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीप्रमाणेच त्यांच्या चाहत्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये आता एका WWE रेसलरची भर पडली आहे.
आयरलँडमधील 36 वर्षीय WWE रेसलर रेसलर बलोर विराट कोहलीच्या फिटनेसचा फॅन झाला आहे. तो त्याच्याकडून क्रिकेटचे धडेही गिरवण्यास इच्छुक असल्याचे त्यानं सांगितले. इतकचं नाही तर, फिटनेसची ट्रेनिंग घेण्यास डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार रेसलर फिन बलोर इच्छुक असल्याचं म्हटलं आहे.
विराट कोहलीकडून सिक्रेटमंत्रा शिकण्याची गरज आहे कारण फिन बलोर आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष देतो. फिनने सांगितले की, मला टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याला भेयायचं आहे तसेच त्याच्यासोबत प्रॅक्टीस मॅचही खेळायची आहे. विराट कोहलीसोबत मैदानात एक-दोन राऊंडही मारायचे आहेत. जेणेकरुन मी विराटचा फिटनेस जवळून पाहू शकेल.
रेसलर बलोर याने सांगितले की, मला क्रिकेटबाबत जास्त माहिती नाही. पण हा खेळ मी पाहिला आहे. मी आयर्लंडमधील असल्याने मला माहिती आहे की, आमच्या देशातील टीमही क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन करत आहे. गेली 15 वर्ष मी जापान आणि अमेरिकेत असल्याने क्रिकेटबाबत मला अधिक माहिती नाहीये. पण, आयरलँड आणि भारत यांच्यात होणारी क्रिकेट सामना पाहण्याची माझी इच्छा आहे.
फिटनेससाठी असा आहे कोहलीचा डाएट प्लानजगातील सगळ्यात फिट क्रिकटर्समध्ये विराटचं नाव मोजलं जातं. जिममध्ये बराच वेळ घाम गाळण्याबरोबरच कॅप्टन कोहली त्याच्या डाएटवरही योग्य प्रकारे भर देतो. वेब सिरीज 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन'मध्ये विराट कोहलीने त्याच्या फिटनेस आणि डाएट प्लानबद्दल सांगितलं आहे. फिट राहण्याचा विराटचा मंत्रा त्याने या सिरीजच्या माध्यमातून सांगितला आहे. जिममध्ये हार्ड ट्रेनिंगबरोबरच विराट दररोज योग्य डाएट फॉलो करतो. दिवसाच्या सुरूवातीला योग्य नाश्ता केला तर आरोग्यासाठी चांगलं असतं, हे आपण नेहमीच ऐकतो. तोच रूल विराटही फॉलो करतो.
विराटच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये अंड्याचा समावेश जास्त आहे. तीन अंड्यांचं ऑमलेट (व्हाइट एग), एक अख्खं अंड विराटच्या ब्रेकफास्ट प्लेटमध्ये असतं. तसंच त्याबरोबर पालकाचा पदार्थ, चीजही नाश्त्यात असतं. पपई, ड्रॅगन फ्रूट आणि कलिंगड ही फळ खाऊन विराट एक कप ग्रीन टी घेतो. सकाळी हेव्ही ब्रेकफास्ट करावा. हेच विराटकडून पाळलं जातं. त्यानंतर प्रॅक्टीस करुन झाल्यानंतर विराट आपल्या दुपारच्या जेवणात ग्रिल्ड चिकन, कुस्करलेले बटाटे, पालकाचा एखादा पदार्थ आणि इतर भाज्या खातो. रात्रीचं जेवण एकदम हलकं असायला हवं, असा सल्ला नेहमीचं डॉक्टरांकडून दिला जातो. विराट त्याच्या रात्रीच्या जेवणात विराट सी-फूड खातो.
बटर चिकन ही विराट कोहलीची सर्वात आवडती डीश आहे, असं नेहमीच त्याचा प्रत्येक फॅनकडून बोललं जातं. पण विराटने गेल्या 4 वर्षांमध्ये विराटने बटर चिकनला हातही लावलेला नाही. आपल्या फिटनेसकडे लक्ष देत विराट हेल्थी लाईफस्टाईलचे सगळे रूल फॉलो करताना दिसतो आहे.