दुबई : इंग्लंडविरुद्ध १ आॅगस्टपासून प्रारंभ होत असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे आॅस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला आयसीसी फलंदाजी क्रमवारीत मागे टाकण्याची संधी आहे. क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर ९२९ गुणांसह स्मिथ असून कोहली ९०३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
चेंडू छेडखानी प्रकरणात १२ महिन्यांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जात असलेल्या स्मिथपेक्षा कोहली २६ मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. स्मिथला पिछाडीवर सोडण्यासाठी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराटला चांगली कामगिरी करावी लागेल. फलंदाजांमध्ये इंग्लंड व भारताचे ५ खेळाडू अव्वल ५० मध्ये आहेत.
भारताचा चेतेश्वर पुजारा सहाव्या, लोकेश राहुल १८व्या, अजिंक्य रहाणे १९ व्या, मुरली विजय २३ व्या आणि शिखर धवन २४व्या स्थानी आहे. इंग्लंडतर्फे ज्यो रुट तिसºया, अॅलिस्टर कुक १३ व्या, जॉनी बेयरस्टो १६ व्या, बेन स्टोक्स २८ व्या आणि मोईन अली ४३ व्या स्थानी आहे. गोलंदाजांमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन अव्वल स्थान कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहील. स्टुअर्ट ब्रॉड १२ व्या स्थानी आहे. दुसºया बाजूचा विचार करताना भारताचे सहा गोलंदाज अव्वल ३० मध्ये आहेत. रवींद्र जडेजा तिसºया, आर. आश्विन पाचव्या, मोहम्मद शमी १७ व्या, भुवनेश्वर कुमार २५ व्या, ईशांत शर्मा २६ व्या आणि उमेश यादव २८ व्या स्थानी आहे. भारताचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव ५६ व्या स्थानी आहे. आयसीसी कसोटी संघांच्या मानांकनामध्ये इंग्लंड पाचव्या स्थानी आहे. यजमान संघ मानांकनामध्ये सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहे. इंग्लंडने ५-० ने विजय मिळवला, तर त्यांच्या मानांकन गुणांमध्ये १० ने वाढ होईल. अशा स्थितीत भारत व त्यांच्यादरम्यानचे मानांकन गुणांचे अंतर केवळ
पाच राहील. (वृत्तसंस्था)
Web Title: Virat has an opportunity to leave Smith behind
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.