अखेर जवळपास तीन वर्षांनी आला. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीने अखेर आपल्या स्फोटक फलंदाजीचा तडाखा दिला. आशिया चषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या औपचारिकता राहिलेल्या सामन्यात ६१ चेंडूंत १२ चौकार आणि ६ षटकारांचा पाऊस पाडत नाबाद १२२ धावांचा झंझावात सादर केला.
२२ नोव्हेंबर २०१९कोहलीने कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्ध इडन गार्डन मैदानावर शतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ८४ डावांमध्ये फलंदाजी केल्यानंतर कोहलीचे हे पहिले शतक ठरले, हे विशेष.
काेहली दुसऱ्या स्थानीआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगसह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावताना ७१ वे शतक ठोकले.
१०२० दिवसांनी शतक -- ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक.- पहिले आंतरराष्ट्रीय टी-२० शतक.- आंतरराष्ट्रीय टी-२० मधील सर्वोत्तम भारतीय खेळी.- आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये शंभर षटकारांचा टप्पा केला पार.- आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ३५०० धावांचा टप्पा पार.
कोहलीचे हे शतक ऐतिहासिक ठरले. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये कोहलीने भारताकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करताना कर्णधार रोहित शर्माची ११८ धावांची खेळीही मागे टाकली.
सर्वाधिक शतक ठाेकणारे -सचिन - १०० - (७७२ डाव)कोहली - ७१ (५२२ डाव)पाँटिंग -७१ (६६८ डाव)