IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

Virat Kohli Candice Warner, IND vs AUS 1st Test: केवळ भारतातच नव्हे तर ऑस्ट्रेलियामध्येही विराट कोहलीची क्रेझ आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 06:46 PM2024-11-21T18:46:06+5:302024-11-21T18:47:25+5:30

whatsapp join usJoin us
Virat is the Superstar of Cricket said Australian cricketer David Warner wife Candice Warner ahead of Border Gavaskar Trophy IND vs AUS 1st Test | IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli, IND vs AUS 1st Test: विराट कोहली सध्या संपूर्ण ऑस्ट्रेलियात चर्चेचा विषय आहे. मीडियापासून ते क्रिकेट तज्ज्ञांपर्यंत सर्वत्र कोहलीच्या नावाचीच चर्चा आहे. चार वेळा पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावस्कर करंडक जिंकायचाच आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीला रोखणे ऑस्ट्रेलियाला गरजेचे आहे. त्यामुळे संघाचे विविध माजी खेळाडू विराट विरुद्ध आपापले प्लॅन्स सांगत आहेत. पण या दरम्यान विराटची ऑस्ट्रेलियात क्रेझ कमी होत नाहीये. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner ) याची पत्नी कँडिस वॉर्नर ( Candice Warner ) हिने विराटची स्तुती केली आहे.


"विराट कोहली हा क्रिकेटमधील सुपरस्टार आहे. विराटचा चाहतावर्ग संपूर्ण जगभरात पसरलेला आहे. विराट कोहलीचे चाहते त्याच्याबद्दल खूपच पॅशनेट असतात. विराटची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. विराट कोहलीचा चाहतावर्ग इतका मोठा आहे की त्याचा मला हेवा वाटतो. ऑस्ट्रेलियात लोक विराट कोहलीची एक झलक पाहायला मिळावी म्हणून वाट पाहत असतात. २७१ मिलियन इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणारा विराट कोहली हा खरंच क्रिकेट या खेळातील खूप मोठा मेगास्टार आहे," अशा शब्दांत डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडिस हिने विराटची स्तुती केली.

ऑस्ट्रेलियात विराट कोहलीची कामगिरी

विराट कोहलीसाठी हे वर्ष कसोटीत चांगले राहिलेले नाही. २०२४ मध्ये, तो फक्त ६ कसोटी सामने खेळला आहे, ज्यामध्ये तो केवळ २३ च्या सरासरीने धावा करू शकला आहे. अशा स्थितीत त्याच्यावर धावा करण्याचे खूप दडपण आहे. मात्र, ऑस्ट्रेलियातील त्याचे आकडे जबरदस्त आहेत. त्याने ऑस्ट्रेलियात १३ सामन्यात ५४च्या सरासरीने १,३५२ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ६ शतकेही झळकावली आहेत. त्यामुळे प्रत्येक ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराटवर चाहत्यांची विशेष नजर असते.


ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅकग्रा विराटबद्दल म्हणतो...

"भारतीय संघ नुकताच न्यूझीलंड विरूद्ध ३-० ने हरला आहे. अशा वेळी त्यांचे सर्वच खेळाडू आताच्या कसोटी मालिकेत सर्व शक्तनिशी उतरतील यात वाद नाही. पण विराट कोहली हा एक भावनिक खेळाडू आहे. खेळात त्याच्या भावना गुंतलेल्या असतात. न्यूझीलंड च्या विरोधात त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. जर ऑस्ट्रेलियाने त्याला कसोटी मालिकेच्या सुरुवातीच्या २-३ डावात स्वस्तात बाद केले तर त्याच्यावर दबाव वाढेल आणि त्याचा ऑस्ट्रेलियाला खूप फायदा होईल. विराट सारखे खेळाडू पटकन सावरतात आणि मैदानात धमाका करू शकतात. त्यामुळे त्याला सुरुवातीलाच थोडासा दबावात आणले तर तो ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरणार नाही," अशा शब्दांत ग्लेन मॅकग्राने विराटविरूद्धचं प्लॅनिंग सांगितले.

Web Title: Virat is the Superstar of Cricket said Australian cricketer David Warner wife Candice Warner ahead of Border Gavaskar Trophy IND vs AUS 1st Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.