सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. अशातच एक धक्कादायक घटना घटली आहे. विराट कोहलीच्या रुममध्ये एक फॅन घुसला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे संतापलेल्या कोहलीने प्रायव्हसीचा मुद्दा उचलून धरला आहे. आता या प्रकरणावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विराटच्या या चाहत्याने हॉटेलमधील त्याच्या खोलीत जाऊन व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. यासोबतच या चाहत्याने किंग कोहलीची हॉटेलची खोली असे कॅप्शनही दिले आहे.
खुद्द विराटने याचा व्हिडीओ शेअर गोपनीयतेचा मुद्दा उचलून धरलाआहे. “आपल्या आवडत्या खेळाडूला पाहून चाहते खूश होतात हे मी समजतो. मी कायमचं याचं कौतुक करतो. परंतु हा व्हिडीओ घाबरवणारा आहे आणि मी माझ्या प्रायव्हसीबाबत चिंतीत आहे. जर मला माझ्या हॉटेलच्या रूममध्ये प्रायव्हसी मिळत नसेल तर पर्सनल स्पेसची मी कुठे अपेक्षा करू शकतो. अशा प्रकारच्या गोष्टींशी मी सहमत नाही. लोकांच्या प्रायव्हसीचा सन्मान करा आणि त्यांना आपल्या मनोरंजनाचं साधन समजू नका,” असे विराट म्हणाला.
यापूर्वीही झाला होता वादटी20 विश्वचषक स्पर्धेत ही पहिलीच वेळ नाही जेव्हा कोहली किंवा टीम इंडिया वादात सापडली नाही. सिडनीमध्ये भारतीय संघाला खाण्यासाठी थंड सँडव्हिच देण्यात आलं होतं. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मासह अनेक खेळाडूंनी ते खाण्यास नकार दिला होता. यानंतर मोठा वाद झाला होता आणि आयसीसीलाही स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. आता विराटच्या रुममध्ये फॅन शिरल्याची घटना घटली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.