Virat Kohli 100th Test, IND vs SL : टीम इंडिया श्रीलंकेविरूद्ध ४ मार्चपासून कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी ही कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माची पहिलीच कसोटी असणार आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे माजी कर्णधार विराट कोहलीची ही १००वी कसोटी असणार आहे. मोहालीच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. पण विराटसाठी अतिमहत्त्वाचा असणारा सामना प्रेक्षकांविना खेळवला जाणार आहे. BCCI च्या नियमांनुसार हा निर्णय घेतल्याचं पंजाब क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यात यावरून नव्या वादाची ठिणगी पडते की काय, अशी शक्यता आहे. तशातच, या मुद्द्यावरून बीसीसीआय खेळत असलेलं गलिच्छ राजकारण थांबवा असा सूर चाहत्यांनी सोशल मीडियावरून व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.
पंजाबमधील धर्मशाला मध्ये झालेल्या दोन टी२० सामन्यात प्रेक्षक मोठ्या संख्येने हजर होते. तसेच, बंगळुरूत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीही प्रेक्षकांच्या हजेरीला परवानगी देण्यात आली आहे. पण विराटच्या १००व्या सामन्याच्या कसोटीसाठी मात्र प्रेक्षकांविना सामना खेळवला जाणार आहे. यासंदर्भात पंजाब क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार निर्णय घेत असल्याचं स्पष्ट केलंय. पण चाहत्यांना मात्र यात बीसीसीआयचं गलिच्छ राजकारण दिसत असून हे राजकारण थांबवा असा संताप सोशल मीडियावरून व्यक्त केला जात आहे. पाहूया काही निवडक प्रतिक्रिया
--
--
--
--
--
--
--
विराटच्या १०० व्या कसोटीबाबत पंजाब क्रिकेट बोर्डाकडून स्पष्टीकरण
"कसोटी सामन्यासाठी जे लोक स्टेडियममध्ये ऑन ड्युटी असतील, त्यांना वगळता इतर कोणालाही स्टेडियमच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. BCCI ने ठरवून दिलेल्या कोविडच्या नियमांनुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे. मोहाली आणि आसपासच्या भागात कोविडच्या काही केसेस आढळल्या आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगत हा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे तीन वर्षांनी मोहालीमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात असूनही चाहत्यांना तिथे प्रवेश नसल्याने चाहत्यांमध्ये नाराजी असणं स्वाभाविक आहे. पण सावधानता बाळगण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जात आहे. परंतु, विराटसाठी हा मोठा सामना असल्याने संपूर्ण स्टेडियममध्ये विराटचे मोठे बॅनर्स लावून सजावट केली जाईल", अशी माहिती पंजाब बोर्डाचे खजिनदार आरपी सिंगला यांनी दिली.