Join us  

Virat Kohli 100th Test : विराट कोहलीला १००व्या कसोटीत खुणावतोय मोठा विक्रम; सचिन, द्रविड, गावसकर, सेहवागच्या पंगतीत मिळालं स्थान

रोहितच्या नेतृत्वाखाली विराट खेळणार १००वी कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 5:09 PM

Open in App

Virat Kohli 100th Test : भारत श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. विशेष बाब म्हणजे विराट कोहलीचा हा १००वा कसोटी सामना असून या सामन्यासाठी ५० टक्के क्षमतेनं प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांमुळे या सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली नव्हती. पण चाहत्यांच्या मागणीनंतर BCCIने निर्णय घेतला. आता विराटला त्याच्या १००व्या कसोटीत एक मोठा विक्रम खुणावतोय.

विराटच्या कोहलीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. कसोटी क्रिकेटमध्येही १०० सामने खेळण्याचा मोठा पराक्रम विराट लवकरच करताना दिसणार आहे. या सामन्यात विराटला एक असा मोठा विक्रम करण्याची संधी आहे, ज्यामुळे त्याला थेट सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांच्या पंगतीत स्थान मिळू शकतं. विराट कसोटी क्रिकेटमध्ये ८ हजारांच्या टप्प्यापासून केवळ ३८ धावा दूर आहे. विराटने ३८ धावांचा टप्पा पार केल्यावर तो ८ हजार धावा पूर्ण करेल.

भारताकडून आतापर्यंत सचिन तेंडुलकरने १५४ डावांत, राहुल द्रविडने १५८ डावांत, सेहवागने १६० डावांत तर सुनील गावसकर यांनी १६६ डावांत ८ हजार धावांचा टप्पा पार केला. विराटने आतापर्यंत १६८ डावांमध्ये ७ हजार ९६२ धावा केल्या आहेत. त्याने पहिल्या कसोटीमध्ये ३८ धावा केल्यास जलदगतीने ८ हजार धावा करणाऱ्यांच्या यादीत तो पाचवा भारतीय ठरेल.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहलीसचिन तेंडुलकरराहुल द्रविड
Open in App