Virat Kohli 100th Test, IND vs SL 1st Test: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ४ मार्चला मोहालीत आपली १००वी कसोटी खेळणार आहे. हा टप्पा गाठणारा विराट भारतीय संघाचा १२वा खेळाडू ठरणार आहे. २०१५ ते २०२१ अशी ६ वर्षे भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीने तेव्हाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. रवी शास्त्री २०१७ ते २०२१ या काळात टी२० विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यामुळे विराट आणि शास्त्री यांची चांगलीच गट्टी जमल्याचं पाहायला मिळालं. याच शास्त्री गुरूजींची नक्कल विराटने केली.
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीच्या १००व्या कसोटी आधी त्याला शुभेच्छा दिल्या आणि या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. रवी शास्त्री यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'ट्रेसर बुलेट' चॅलेंजसह एक व्हिडिओ पोस्ट केला. त्या व्हिडिओमध्ये विराट कोहलीने रवी शास्त्रींची प्रसिद्ध कॉमेंट्री लाइन असलेल्या 'ट्रेसर बुलेट'ची नक्कल केल्याचं दिसतंय. पाहा व्हि़डीओ
रवी शास्त्री यांनी व्हिडीओला कॅप्शन लिहिलं की, 'विराट कोहलीची १००वी कसोटी साजरी करण्यामागे १०० वेगवेगळी कारणे आहेत. त्याने मारलेल्या चौकारांसारखंच त्याच्या १००व्या कसोटीचा हॅशटॅगही ट्रेसर बुलेट म्हणजे बंदुकीच्या गोळीच्या वेगाने पुढे पसरू दे.' तसंच त्याचं एक चॅलेंजही त्यांनी दिलं. विराट कोहलीनेही रवी शास्त्रींची ट्रेसर बुलेट लाईन आपल्या पद्धतीने बोलून दाखवली. त्यानंतर मिस्कीलपणे डोळा मारून 'कशी वाटली नक्कल' असा प्रश्नही विचारला.
Web Title: Virat Kohli 100th Test he Mimics Ravi Shastri over tracer bullet commentary challenge mischievously asks hows it watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.