IND Vs SL 1st Test: ‘कधी वाटलं नव्हतं की १०० कसोटी सामने खेळेन’, शंभराव्या कसोटीपूर्वी विराट कोहली भावूक 

Virat Kohli 100th Test: उद्यापासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणारा पहिला कसोटी सामना भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. विराट कोहली त्याचा कसोटी कारकिर्दीमधील १०० वा कसोटी सामना खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 04:25 PM2022-03-03T16:25:06+5:302022-03-03T16:26:31+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli 100th Test: ‘Never thought I would play 100 Test matches’, Virat Kohli passionate before 100th Test | IND Vs SL 1st Test: ‘कधी वाटलं नव्हतं की १०० कसोटी सामने खेळेन’, शंभराव्या कसोटीपूर्वी विराट कोहली भावूक 

IND Vs SL 1st Test: ‘कधी वाटलं नव्हतं की १०० कसोटी सामने खेळेन’, शंभराव्या कसोटीपूर्वी विराट कोहली भावूक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली - उद्यापासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणारा पहिला कसोटी सामना भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. विराट कोहली त्याचा कसोटी कारकिर्दीमधील १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहलीचा एक इमोशनल व्हिडीओ व्हायरल झाला आहे. १०० कसोटी सामने खेळेन, असे कधी वाटले नव्हते, असे विराट कोहली या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

विराट कोहलीने हे भावूक विधान बीसीसीआयकडून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये केले आहे. बीसीसीआयने एक शॉर्ट व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात विराट कोहलीने सांगितले की, प्रामणिकपणे सांगायचं तर मी जीवनामध्ये कधीही विचार केला नव्हता की मी १०० कसोटी खेळू शकेन. हा एक खूप प्रदीर्घ प्रवास आहे.

विराट पुढे म्हणाले की, मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला १०० कसोटी सामने खेळण्याचे भाग्य मिळाले. या प्रवासामध्ये मी खूप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो. येथे पोहोचण्यासाठी मला खूप कठोर मेहनत घ्यावी लागली. हा क्षण माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी फार मोठा आहे. विशेषकरून माझ्या प्रशिक्षकांसाठी ज्यांना सर्वाधिक आनंद झाला आहे. मी माझ्या करिअरमध्ये त्यांच्याकडूनच खूप काही शिकलो होतो. 

Web Title: Virat Kohli 100th Test: ‘Never thought I would play 100 Test matches’, Virat Kohli passionate before 100th Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.