Join us  

Virat Kohli 100th Test vs BCCI, IND vs SL Test : अरे देवा.. विराट कोहलीचं नशीबच दगाबाज! १००वी कसोटी खेळणार समजताच क्रिकेट बोर्डाने घेतला कठोर निर्णय

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विराट खेळणार १००वी कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 7:44 PM

Open in App

Virat Kohli 100th Test, IND vs SL : भारतीय संघ श्रीलंकेविरूद्ध ४ मार्चपासून कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना हा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी विशेष असणार आहे. Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली लंकेविरूद्ध विराट आपला १००वा कसोटी सामना मोहालीच्या मैदानावर खेळणार आहे. सध्या सुरू असलेल्या भारत-श्रीलंका टी२० मालिकेत प्रेक्षक स्टेडियममध्ये दिसत आहेत. त्यामुळे विराटच्या १००व्या कसोटीसाठीही प्रेक्षक मैदानात असतील, असा साऱ्यांचा अंदाज होता. मात्र यावेळीही विराटच्या नशिबाने त्याला दगा दिला. मोहाली आणि आसपासाच्या विभागात कोरोनाच्या नवीन केसेस सापडत असल्याने  पंजाब क्रिकेट असोसिएशनने ती कसोटी प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडच्या नियंमाचे पालन करण्याच्या उद्देशाने BCCI च्या नियमांनुसार हा सामना प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार आहे.

"कसोटी सामन्यासाठी जे लोक स्टेडियममध्ये ऑन ड्युटी असतील, त्यांना वगळता इतर कोणालाही स्टेडियमच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. BCCI ने ठरवून दिलेल्या कोविडच्या नियमांनुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे. मोहाली आणि आसपासच्या भागात कोविडच्या काही केसेस आढळल्या आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगत हा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे तीन वर्षांनी मोहालीमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात असूनही चाहत्यांना तिथे प्रवेश नसल्याने चाहत्यांमध्ये नाराजी असणं स्वाभाविक आहे. पण सावधानता बाळगण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जात आहे. परंतु, विराटसाठी हा मोठा सामना असल्याने संपूर्ण स्टेडियममध्ये विराटचे मोठे बॅनर्स लावून सजावट केली जाईल", अशी माहिती पंजाब बोर्डाचे खजिनदार आरपी सिंगला यांनी दिली.

विराटसाठी सुनील गावसकरांचा खास संदेश

विराटने कसोटी क्रिकेटमध्ये आता तिसऱ्या क्रमांकावर खेळायला हवं. पुजारा आणि रहाणे नसताना तिसऱ्या क्रमांकावर संघातील सर्वोत्तम खेळाडूनेच खेळलं पाहिजे. पण विराट कोहली हा चौथ्या क्रमांकावर बरेच वर्ष खेळतो आहे. त्यामुळे त्यात बदल न करण्याचा निर्णय जर संघ व्यवस्थापन घेत असेल, तर तीन नंबरवर भारताकडे हनुमा विहारी हा चांगला एक पर्याय असू शकतो", असं गावसकर म्हणाले.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहलीबीसीसीआयरोहित शर्मा
Open in App