Virat Kohli 100th Test, IND vs SL: टी२० असो किंवा टेस्ट... Rishabh Pant चा सिक्सर कायमच असतो बेस्ट! (Video)

ऋषभ पंतने स्पिनरला पुढे येऊन उत्तुंग असा षटकार मारला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 04:23 PM2022-03-04T16:23:14+5:302022-03-04T16:26:58+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli 100th Test Video of Rishabh Pant hitting big six in IND vs SL 1st Test Live Updates BCCI | Virat Kohli 100th Test, IND vs SL: टी२० असो किंवा टेस्ट... Rishabh Pant चा सिक्सर कायमच असतो बेस्ट! (Video)

Virat Kohli 100th Test, IND vs SL: टी२० असो किंवा टेस्ट... Rishabh Pant चा सिक्सर कायमच असतो बेस्ट! (Video)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli 100th Test, IND vs SL: भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली १००व्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरला. तसेच नवा कसोटी कर्णधार रोहित शर्माचाही हा पहिलाच सामना ठरला. विशेष पराक्रमासाठी सामन्याआधी विराटचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने चहापानापर्यंत द्विशतकी मजल मारली. पण त्यातही ऋषभ पंतच्या षटकाराची विशेष चर्चा रंगली.

ऋषभ पंत हा कसोटीपटू म्हणून योग्य नाही असं अनेकांचं सुरूवातीला मत होतं. पण पंतने कसोटी क्रिकेटमध्ये आपली एक खास शैली दाखवत संघात स्थान पक्कं केलं. आजही पंतने फलंदाजीला आला आणि त्याने फटकेबाजी करायला सुरूवात केली आणि एक उत्तुंग असा षटकार लगावला. टी२० असो किंवा कसोटी सामना, त्याच्या शैलीमुळे त्याने लगावलेला षटकार खऱ्या अर्थाने प्रेक्षणीय ठरला. पाहा पंतचा षटकार-

दरम्यान, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना मयंक अग्रवाल (३३) आणि रोहित शर्मा (२९) यांना चांगली सुरूवात मिळाली पण त्याचं मोठ्या खेळीत रूपांतर करणं त्यांना जमलं नाही. हनुमा विहारीने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दमदार अर्धशतक ठोकलं. तो ५८ धावांवर बाद झाला. तर विराटला अर्धशतकाने हुलकावणी दिली. ऋषभ पंतने मात्र फटकेबाजी करत उल्लेखनीय कामगिरी केली आणि संघाला मोठी धावसंख्या गाठून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

Web Title: Virat Kohli 100th Test Video of Rishabh Pant hitting big six in IND vs SL 1st Test Live Updates BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.