Virat Kohli Umpire fight, IPL 2022 GT vs RCB Live: माजी कर्णधार विराट कोहली आणि युवा फलंदाज रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने गुजरात टायटन्सला १७१ धावांचे आव्हान दिले. विराट कोहली आणि रजत पाटीदार या दोघांनी ९९ धावांची दमदार भागीदारी करत संघाला २० षटकात मोठी धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजीच्या वेळी विराट आणि अंपायर यांच्यात एक वेगळाच प्रसंग घडला.
१७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा वृद्धिमान साहा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल फटकेबाजी करण्याची सुरूवात करत होता. त्यावेळी शाहबाज अहमदने टाकलेला चेंडू बाहेरच्या दिशेने वळला. त्याचा फटका हुकला आणि पंचांनी त्याला बाद ठरवले. पण शुबमन गिलला निर्णय पटला नाही. त्यामुळे त्याने DRSची मदत घेतली. DRS मध्ये चेंडू मारण्याच्या वेळेस किपरचा ग्लोव्ह्ज स्टंपच्या लाईनमध्ये असल्याचे दिसले. त्यामुळे तो चेंडू नो बॉल ठरवण्यात आला. घडलेला प्रकार पाहता, विराट कोहली लगेच अंपायरवर चाल करून गेला. पण अंपायरने त्याला नियम समजावून सांगितल्यावर तो स्वत:वरच हसला. पाहा व्हिडीओ-
नक्की काय आहे नियम? - क्रिकेटच्या नियमानुसार, गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने मारण्याआधी किंवा चेंडू बॅटला न लागल्यास स्टंपच्या मागे जाण्याआधीच जर किपरच्या शरीराचा कोणताही भाग स्टंपच्या रेषेत आला किंवा त्यापुढे आला तर तो नो बॉल दिला जातो.
--
--
दरम्यान, टॉस जिंकून RCB ने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार डु प्लेसिस शून्यावर बाद झाला. त्यानंतर विराट-रजत जोडीने चांगली सुरूवात केली. रजत पाटीदारने ५२ तर विराट कोहलीने ५८ धावा केल्या. या दोघांनंतर ग्लेन मॅक्सवेलने ३३ धावा चोपल्या. तसेच अखेरच्या टप्प्यात महिपाल लोमरॉरने १६ धावा करत संघाला १७० पर्यंत नेले.