Join us  

विराट कोहलीनं 'दादा' चं ऐकलं; सौरव गांगुलीचा 'तो' प्रस्ताव मान्य

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता भारतीय नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 8:50 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता भारतीय नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष झाला आहे. गुरुवारी मुंबईत त्यानं कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत भारतीय क्रिकेटच्या भविष्याबाबत चर्चा केली. यावेळी गांगुलीनं कसोटी क्रिकेटच्या प्रसारासाठी ठेवलेला प्रस्ताव कोहलीनं मान्य केला. कोहलीचा या प्रस्तावाला विरोध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, पण शुक्रवारी गांगुलीनंच यावर पडदा टाकला. जाणून घेऊया नेमकं काय घडलं...

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर गांगुलीनं भारतीय संघानं डे-नाईट कसोटी खेळावी, असा तोंडी प्रस्ताव ठेवला होता. पण, त्याला कोहलीचा विरोध असल्याची चर्चा होती. गुरवारी कोहली व रोहितसोबत झालेल्या बैठकीत गांगुलीनं या मुद्यावर चर्चा केली. त्यानंतर कोलकाता येथे झालेल्या कार्यक्रमात गागुंलीनं याबद्दलचे अपडेट्स दिले. तो म्हणाला,''डे-नाईट कसोटीबद्दल आम्ही सर्वच विचार करत आहोत. त्यादृष्टीनं भविष्यात आम्ही काहीतरी करू. डे-नाईट कसोटीमुळे या फॉरमॅटकडे प्रेक्षक वळतील, असा माझा विश्वास आहे. कोहलीनंही या मताशी सहमती दर्शवली आहे. अनेक वृत्तपत्रांत मी वाचले की कोहलीचा विरोध आहे म्हणून, पण तसे काही नाही. कसोटीचा प्रसार व प्रचार व्हायला हवा. लोकं आपले काम संपवून संध्याकाळी कसोटी क्रिकेट पाहायला येतील. डे-नाईट कसोटी टीम इंडिया कधी खेळेय याची कल्पना नाही, पण हे नक्की होईल.''

बंगाल क्रिकेट असोसिएशनतर्फे सौरव गांगुलीचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला. यावेळी गांगुलीनं इंडियन प्रीमिअर लीगची ( आयपीएल) तुलना इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) फुटबॉलशी केली. तो म्हणाला,''इपीएलप्रमाणे आयपीएलही जगातील मोठी लीग आहे. क्रिकेटचा सर्वतोपरी विकास करणे हे माझं काम आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट माझे प्राधान्य आहे. ज्या क्रिकेटपटूंना टीम इंडियाकडून खेळता आले नाही, त्यांना सर्व सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असेल.'' 

टॅग्स :विराट कोहलीसौरभ गांगुलीबीसीसीआय