बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली ( Virat Kohli) यांना कन्यारत्न झाली आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला होता. भारताचे क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन आणि रोहित शर्मा या सर्वांना मुलगी आहे आणि त्यांच्या क्लबमध्ये विराटचा समावेश झाला आहे.
विराटनं ट्विट केलं की,''तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की, आज दुपारी आमच्या घरी कन्यारत्न आली. तुमच्या प्रेमाचा, प्रार्थनेचा आणि शुभेच्छांचा मी आभार मानतो. अनुष्का आणि मुलगी दोन्ही ठणठणीत आहेत आणि आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. आशा करतो तुम्ही आमच्या प्रायव्हेसीचा आदर कराल. तुमचा विराट''
विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता. या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि 2017 साली दोघांनी इटलीत लग्न केले.
काही दिवसांपूर्वी पापाराझींनी अनुष्काचे विराटसोबतचे काही खाजगी फोटो क्लिक केले होते आणि हे पाहून अनुष्का भडकली होती. तिने सोशल मीडियावर याबद्दलची नाराजी व्यक्त करत, पापाराझींचा चांगलाच क्लास घेतला होता. विराट आणि अनुष्का घराच्या लॉबीत एकमेकांसोबत क्वॉलिट टाईम स्पेंड करत असताना पाहून काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो क्लिक केले होते. हेच फोटो नंतर व्हायरल झाले होते. नेमक्या याच कारणाने अनुष्काचा पारा चढला होता.