Join us

विराट-अनुष्का बर्फांच्या देशात सुट्टी करतायत एन्जॉय, फोटो झाले वायरल

कोहलीने आपल्या पोस्टमध्ये कुठे गेलो, हे सांगितलेले नसले तरी चाहत्यांनी मात्र त्यांचे ठिकाण शोधून काढले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 16:45 IST

Open in App

 मुंबई : सध्याच्या घडीला भारतीय संघाचे कोणतेही सामने नाहीत. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीला सध्या सुट्टी आहे. कोहली हा सुट्टीमध्ये पत्नी अनुष्का शर्माबरोबर बर्फांच्या देशात गेला आहे, पण हा देश नेमका आहे तरी कोणता...

विराट आणि अनुष्का ही सेलिब्रेटी जोडी आहे. या दोघांच्या कोणत्याही गोष्टी सोशल मीडियावर वायरल होताना दिसतात. सध्याच्या घडीला हे कपल सुट्यांचा आनंद घेत आहे. विराटने सोशल मीडियावर अनुष्काबरोबरचे फोटो पोस्ट केले आहे. पण कोहलीने आपण नेमके कुठे गेलो आहोत, हे मात्र सांगितलेले नाही.

कोहलीने आपल्या पोस्टमध्ये कुठे गेलो, हे सांगितलेले नसले तरी चाहत्यांनी मात्र त्यांचे ठिकाण शोधून काढले आहे. विराट आणि अनुष्का हे स्विर्त्झंलंडच्या स्टाड या शहरात असल्याचा कयास चाहत्यांनी लावला आहे.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मास्वित्झर्लंड