Join us  

Virat Kohli and Anushka Sharma :१६ कोटींचं औषध, दुर्मिळ आजाराशी संघर्ष करतोय २ वर्षांचा मुलगा; विराट कोहली-अनुष्का शर्मा धावले मदतीला 

Virat Kohli and Anushka Sharma have helped to raise 16 CR for Ayaansh who was suffering from Spinal Muscular Atrophy  : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Virat Kohli and Anushka Sharma) ही जोडी सातत्यानं समाजसेवेत पुढाकार घेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 3:05 PM

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Virat Kohli and Anushka Sharma) ही जोडी सातत्यानं समाजसेवेत पुढाकार घेत आहे. देशाला कोरोना लढ्यात हातभार लावण्यासाठी विरुष्कानं नुकतेच एका मोहीमेतून ११ कोटींचा निधी जमा केला. त्यांनी स्वतः या मोहीमेत २ कोटींची मदत केली. गतवर्षीही लॉकडाऊनच्या काळात या पती-पत्नीनं पंतप्रधान सहाय्यता निधीत हातभार लावला होता. त्यांनी ही रक्कम जाहीर केली नसली तरी या दोघांनी तीन कोटींची मदत केल्याचे सूत्रांनी सांगितले होते. आता हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हैदराबाद येथील दोन वर्षांच्या मुलाला दुर्मिळ आजार झाला आहे आणि त्यावरील उपचारासाठी त्याला १६ कोटींची गरज आहे. विराट-अनुष्का यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ( Virat Kohli and Anushka Sharma have helped to raise 16 CR for Ayaansh who was suffering from Spinal Muscular Atrophy ) मोठी घोषणा: कोरोना लढ्यात BCCIचा मदतीचा हात, विराट कोहलीच्या संघाकडून ४५ कोटींचा हातभार!

बॉलिवूड सेलिब्रेटी राजकुमार राव यानं मागील  महिन्यात एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यानं आयांश याला जगातील सर्वात महागड्या औषधाची गरज आहे. तुम्ही त्याची अखेरची आशा आहात. त्याला मदत करा, असे आवाहन केलं होतं. त्यानंतर आलिया भट, अजय देवगण, कार्तिक आर्यन, अनिल कपूर, श्रद्धा कपूर, सारा अली खान, अर्जुन कपूर आदींनी मदत केली. या लिस्टमध्ये आता विराट-अनुष्काचे नावही सामील झाले आहे. बाबो; विराट कोहली नव्हे तर 'हा' कर्णधार घेतो सर्वाधिक पगार; पाकिस्तानचा बाबर आझम अजूही खेळतोय लाखांतच!

आयांश गुप्ता ( Ayaansh Gupta) असे या दोन वर्षांच्या मुलाचे नाव आहे. त्याला पाठीच्या स्नायूचा ( Spinal Muscular Atrophy Type 1 ) दुर्मिळ आजार झाला आहे. रुपल व योगेश हे त्याचे आई-वडील क्राऊड फंडींग जमा करत आहेत. Spinal Muscular Atrophy हा आजार लहानमुलांच्या नसा व स्नायूंवर हल्ला करतो. त्यामुळे लहान मुलांना त्यांचं दैनंदिन काम करण्यासही मोठी अडचण निर्माण होते. उदा. बसणे, डोकं वर करणे, दुध पिणए आणि श्वास घेणे. जगातील १० हजार मुलांमधील १ मुलामध्ये हा आजार आढळतो.  माँ माँ होती है!; ऑक्सिजन मास्क तोंडाला लावून लेकरांसाठी जेवण बनवणाऱ्या आईला पाहून वीरू Emotional

भारताची माजी महिला क्रिकेटपटू केएस श्रवंती नायडू ( Sravanthi Naidu) हिची आई एस के सुमन यांचा कोरोनाशी लढा सुरू आहे. त्यांच्या उपचारासाठी श्रवंतीनं आधीच १६ लाख रुपये खर्च केले आहेत आणि तिला आणखी मदतीची गरज आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानं श्रवंतीच्या आईच्या उपचारासाठी 6.77 लाखांची मदत केली होती. पण, दुर्दैवानं तिच्या आईचे नुकतेच निधन झाले.

विराट व अनुष्का यांनी Ketto सोबत एक मोहीम सुरू केली होती आणि सुरुवातीला त्यांनी ७ कोटींचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. हा जमा होणारा निधी भारताच्या कोरोना लढ्यासाठी दान करण्यात येणार आहे. या मोहिमेतून ११ कोटी ३९ लाख ११, ८२० जमा केले आहेत. 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा