Join us  

WPL 2023 : Breaking : स्मृती मानधनाची RCBच्या कर्णधारपदी निवड; विराट, फॅफ यांनी केली घोषणा

नुकत्याच पार पडलेल्या लिलावात स्मृती मानधनासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB)  सर्वाधिक ३.४० कोटींची बोली लावली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 10:11 AM

Open in App

Royal Challengers Bangalore, WPL: महिला प्रीमिअर लीग २०२३ ची जोरदार तयारी सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लिलावात स्मृती मानधनासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB)  सर्वाधिक ३.४० कोटींची बोली लावली. WPL Auction मध्ये स्मृती सर्वात महागडी खेळाडू ठरली. एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष आदी स्टार खेळाडूंनाही RCB ने आपल्या ताफ्यात घेतले आणि हा संघ सध्या तगडा दिसत आहेत. संघात एवढे दिग्गज खेळाडू असताना कर्णधारपद कोणाकडे दिले जाईल याची सर्वांनाच उत्सुकता होती आणि शनिवारी विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस याच्यांकडून त्याची घोषणा करण्यात आली. भारताची सलामीवीर स्मृती मानधना ( Smriti Mandhana) हिची RCBच्या महिला संघाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. 

स्मृती मानधनाने भारतीय महिला संघाचेही नेतृत्व सांभाळले आहे. तिने भारताकडून ४ कसोटी सामन्यांत १ शतक व २ अर्धशतकांसह ३२५ धावा केल्या आहेत. वन डेत तिने ७७ सामन्यांत ३०७३ धावा केल्या आहेत आणि त्यात ५ शतकं व २५ अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-२०त ११३ सामन्यांत २६६१ धावा तिच्या नावावर आहेत.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB's team for WPL )- स्मृती मानधना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, रिचा घोष, एरिन बर्न्स, दीशा कसत, श्रेयंका पाटील, कनिका, ए शोबना, इंद्रानी रॉय, हिदर नाईट, डॅन व्हॅन निएकर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांझड, मीगन शुट, सहाना पवार  

RCB महिला संघाचा कोचिंग स्टाफमुख्य प्रशिक्षक - बेन सॉयरसहाय्यक प्रशिक्षक व स्काऊटिंग प्रमुख - मलोलन रंगराजनस्काऊट आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक - वनिता व्हीआरफलंदाजी प्रशिक्षक - आरएक्स मुरलीसंघ व्यवस्थापक व डॉक्टर - डॉ. हरिनी थेरेपिस्ट - नवनिता गौतम    

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगस्मृती मानधनारॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App