No formal charges filed against India for Newlands DRS bust-up : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेचा निकाल यजमानांच्या बाजूनं २-१ असा लागला. भारताला आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही, असा दावा केला गेल्यानंतर यजमानांनी केलेल्या पुनरागमनाचे कौतुक करावे तितके कमीच. केपटाऊन कसोटीत आफ्रिकेनं ७ विकेट्स राखून विजय मिळवून भारताचे मालिका विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. जसप्रीत बुमराहचे पंचक, रिषभ पंतचे शतक अन् त्याला किगन परेरा व डीन एल्गर यांच्याकडून मिळालेले प्रत्युत्तर.. या शिवाय हा सामना गाजला तो भारतीय खेळाडूंनी DRS विरुद्ध उभारलेल्या बंडानं... त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यासह इतरांवर आयसीसी काय कारवाई करते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.
पण, विराट कोहली अँड कंपनीनं DRS वरून जे काही टीका टिप्पणी केली त्यावर आयसीसीच्या अधिकाऱ्यानं महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणी कोणत्याही खेळाडूविरोधात औपचारिक ओराप दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती आयसीसीच्या सामनाधिकाऱ्यांनी दिली. ESPNcricinfoनं दिलेल्या वृत्तानुसार सामनाधिकाऱ्यांनी या घडलेल्या प्रकाराबद्दल भारतीय संघ व्यवस्थापनाला खबरदारी घेण्याचा सल्ला दिला, परंतु सध्यातरी भारतानं कोणत्याही प्रकारच्या नियमाचे किंवा कलमाचे उल्लंघन केले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तिसऱ्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही विराटनं या प्रकरणावर प्रतिक्रिया देणए टाळले. तो म्हणाला, मैदानावर काय घडले हे आम्हाला माहित्येय आणि बाहेर बसलेल्या लोकांना मैदानावर नेमकं काय घडलं याची माहिती नाही.
या कसोटीत नेमकं काय घडलं?आर अश्विननं टाकलेल्या २१व्या षटकातील एक चेंडू दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरच्या पॅडवर आदळला अन् सर्वांना जोरदार अपील केले. मैदानावरील पंच एराम्सस यांनी लगेच बोट वर केले. मोठी विकेट मिळाली म्हणून भारतीय खेळाडू आनंदात होते. पण, एल्गरनं लगेच DRS घेतला. चेंडू यष्टींवर आदळत असल्याचा विश्वास सर्वांनाच होता, पण रिप्लेत चेंडू स्टम्प्सच्या वरून जाताना दिसला अन् एराम्सस यांना निर्णय बदलावा लागला. त्यावेळेस त्यांनीही हे शक्य नाही अशीच प्रतिक्रिया दिली.
विराट मात्र संतापला अन् षटक संपल्यानंतर स्टम्प्स माईककडे जाऊन बडबडला. तो म्हणाला, ''तुमचा संघ जेव्हा चेंडू चमकवतात तेव्हा त्यांच्यावरही लक्ष ठेव, फक्त प्रतिस्पर्धी संघावर नको. लोकांचं लक्ष वेधण्याचा सतत प्रयत्न करत असतोस.''
उप कर्णधार लोकेश राहुल हाही तेव्हा म्हणाला की, संपूर्ण देश मिळून ११ खेळाडूंविरुद्ध खेळतोय. आणि अश्विन म्हणाला, जिंकण्यासाठी कोणतातरी दूसरा मार्ग शोधा, सुपरस्पोर्ट्स
Web Title: Virat Kohli and his India team-mates have been spoken to about the DRS bust-up on the third day, No formal charges filed against India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.