India tour of England : भारतीय संघासाठी आनंदवार्ता; WTC final नंतर 20 दिवसांची सुट्टी अन् कुटुंबीयांसोबत भटकंती

Indian cricketers to get 20-day break from bio-bubble लंडनला रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडू मुंबईत 14 दिवसांच्या विलगिकरणात होते आणि लंडनला पोहोचल्यानंतरही त्यांना विलगिकरणात रहावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 03:56 PM2021-06-08T15:56:04+5:302021-06-08T15:58:42+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli and other Indian cricketers to get 20-day break from bio-bubble after WTC final in England | India tour of England : भारतीय संघासाठी आनंदवार्ता; WTC final नंतर 20 दिवसांची सुट्टी अन् कुटुंबीयांसोबत भटकंती

India tour of England : भारतीय संघासाठी आनंदवार्ता; WTC final नंतर 20 दिवसांची सुट्टी अन् कुटुंबीयांसोबत भटकंती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारत-न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल 18 जूनपासून

WTC final 2021 : आयसीसी कसोटी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. 18 ते 23 जून या कालावधीत जागतिक कसोटीची फायनल होईल आणि त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत मैदानावर उतरेल. दरम्यान, सततच्या बायोबबलमधून भारतीय खेळाडूंना दिलासा मिळणार आहे. बायो बबल ही कोणाचीही मानसिक कसोटी पाहणारा काळ असतो, त्यामुळे  WTC final नंतर भारतीय खेळाडूंना 20 दिवसांची सुट्टी दिली जाणार आहे. त्या 20 दिवसांत त्यांना कुटुंबीयांसोबत लंडनवारी करता येणार आहे.( Indian players, however, will get a 20-day respite from the bubble life after the completion of the World Test Championship (WTC) final) 

विराट कोहली अँड टीमची ही सुट्टी 24 जूनपासून सुरू होणार आहे आणि 14 जुलैला त्यांना पुन्हा बायो बबलमध्ये दाखल व्हावे लागणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यातली कसोटी मालिका 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे.  " भारतीय खेळाडूंना 24 जूनपासून सुट्टी दिली जाणार आहे. 23 जून हा न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी फायनलचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी खेळाडूंना पुन्हा 14 जुलैपासून बायो बबलमध्ये दाखल व्हावे लागणार आहे," अशी माहिती सूत्रांनी ANI लादिली. 100 मीटर लांब षटकाराला 8 धावा, leg bye चा नियम बाद करा; भारतीय क्रिकेटपटूनं सुचवले बदल !

या काळात खेळाडूंना कुठेही भटकंती करायची मूभा आहे का, असे विचारल्यावर लंडनमध्येच त्यांना फिरता येईल असे सांगितले. "खेळाडूंना थोडीशी विश्रांती गरजेची आहे, पण म्हणून कोरोना नियमांमध्ये सुट देऊन चालणार नाही. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे खेळाडू व कुटुबीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्लान आखला गेला आहे. नव्या देशात प्रवास करताना अडकून पडण्यापेक्षा नियोजन करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे खेळाडू लंडनमध्येच फिरायला जाऊ शकतील," असेही सूत्रांनी सांगितले.  ऑली रॉबिन्सननंतर जोफ्रा आर्चरचं ट्विट चर्चेत; रोहित शर्मावर केली होती टीका, इंग्लंडचा गोलंदाज अडचणीत?

 जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर भारत-इंग्लंड यांच्यात नॉटिंगहॅम ( ४ ते ८ ऑगस्ट), लॉर्ड्स ( १२ ते १६ ऑगस्ट), लीड्स ( २५ ते २९ ऑगस्ट), ओव्हल ( २ ते ६ सप्टेंबर) आणि मँचेस्टर ( १० ते १४ सप्टेंबर) असे पाच कसोटी सामने होणार आहेत. IPL 2021ला वाचवण्यासाठी BCCI नं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा दिलाय बळी?; एका निर्णयानं वाढवली आयसीसीची डोकेदुखी

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव;

लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर;

राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला.

 

Web Title: Virat Kohli and other Indian cricketers to get 20-day break from bio-bubble after WTC final in England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.