Join us  

T20 World Cup: कोहलीची रिषभ पंतला संघाबाहेर करण्याची धमकी! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी Video समोर

T20 World Cup 2021, India vs New Zealand: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघावरील दबाव आता वाढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 6:02 PM

Open in App

T20 World Cup 2021, India vs New Zealand: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघावरील दबाव आता वाढला आहे. पहिल्याच सामन्यात तब्बल १० विकेट्सनं पराभवाला सामोरं जावं लागलेल्या भारतीय संघासमोर आता न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंच्या संघ निवडीबाबतही प्रश्नचिन्हं उपस्थित केलं गेलं. यात भुवनेश्वर कुमारची निवड करण्याच्या निर्णयावरुन दुमत पाहायला मिळालं. पण आता पराभव विसरुन न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी संघ जोरदार सराव करत आहे. ३१ ऑक्टोबर रोजी भारताची न्यूझीलंडविरुद्ध लढत असणार आहे. या सामन्यासाठी देखील भारतीय संघातील खेळाडूंच्या निवडीवरुन चर्चा आणि तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचं महत्त्व लक्षात घेत आता स्टार स्पोर्ट्सनंही टेलिव्हिजनवर सामन्याची उत्कंठा ताणून धरण्यासाठी जोरदार हवा करण्यास सुरुवात केली आहे. याच अंतर्गत स्टारस्पोर्ट्सनं कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांची एक जाहीरात प्रदर्शित केली आहे. या जाहिरातीत कोहली आणि रिषभ यांच्यात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याबाबत फोनवर चर्चा सुरू आहे. टीम इंडियाच्या फॅन्सनं दिलेले सल्ले रिषभ पंत कोहलीला सांगताना दिसतोय. त्यावर विराट कोहलीनं रिषभ पंत याचीच फिरकी घेतली आणि तू सामन्यावर लक्ष केंद्रीत कर असा सल्ला त्याला दिला आहे. 

कोहली आणि ऋषभ यांच्यातील संवाद...रिषभ- विराट भैय्या...विराट- हा बोल ऋषभरिषभ- न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकण्यासाठी मला एका फॅननं सांगितलंय की प्रत्येक विकेट पडल्यानंतर मला ग्लोव्हज बदलायला हवेत. विराट- हो का. मग याच हिशोबान मलाही प्रत्येक षटकार ठोकल्यानंतर बॅट बदलायला हवी. रिषभ- जिंकण्यासाठी काहीतरी तडजोड करावीच लागते ना.विराट- अच्छा. मग मी विचार करतोय की या सामन्यात यष्टीरक्षकच बदलतो. (हसत)रिषभ- काय विराट भैय्या...तू पण (हसत)विराट- तू या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर आणि सामन्यावर लक्ष केंद्रीत कर

पाहा स्टार स्पोर्ट्सची जाहिरात-

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१विराट कोहलीरिषभ पंत
Open in App