Join us  

IND vs WI 3rd T20 : विराट, ऋषभ तिसरा T-20 खेळणार नाही, श्रीलंके विरुद्धच्या मलिकेलाही मुकणार; BCCIनं दिला बायो बबल ब्रेक

विराट कोहलीने वेस्टइंडीजविरुद्ध अहमदाबाद येथे 3 वन डे आणि कोलकाता येथे 2 टी-20 सामने खेळले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 11:20 AM

Open in App

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी विराट कोहली आणि ऋषभ पंत या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी, तसेच रविवारी होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी, विराट कोहलीला बायो बबलपासून आरामासाठी ब्रेक देण्यात आला आहे. यानंतर विराट घराकडे रवाना झाला आहे. याशिवाय, ऋषभपंतलाही बायो बबल ब्रेक देण्यात आला आहे. यामुळे आता या दोघांनाही वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्याला आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकावे लागणार आहे.

विराट कोहलीने वेस्टइंडीजविरुद्ध अहमदाबाद येथे 3 वन डे आणि कोलकाता येथे 2 टी-20 सामने खेळले आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 3 टी-20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका डोळ्यासमोर ठेवून विराट कोहलीला ब्रेक देण्यात आला आहे. 24 फेब्रुवारीपासून लखनौ येथे पहिल्या टी-20 सामन्याने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला टी-20 सामना लखनौ येथे खेळवला जाणार आहे. तर नंतरचे दोन टी-20 सामने धर्मशाला येथे खेळवले जाणार आहेत.टी-20 मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. मोहाली येथे 4 मार्चपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार असून दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. मोहाली येथे खेळवली जाणारी पहिली कसोटी विराट कोहलीसाठी खूप खास असेल. विराट आपली 100वी कसोटी खेळण्यासाठी मोहालीत उतरणार आहे. बेंगळुरू येथे होणारा दुसरा कसोटी सामना हा देशात खेळवला जाणारा तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना असेल. 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयरिषभ पंतभारतीय क्रिकेट संघ
Open in App