वर्ल्ड कप गाजवला, पण निराश मनाने रोहित शर्मा, विराट कोहली मुंबईत दाखल, Video 

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक १० सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला अंतिम फेरीत अपयशाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 06:30 PM2023-11-20T18:30:30+5:302023-11-20T18:31:41+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli and Rohit Sharma return to Mumbai after the World Cup final in Ahmedabad, Video | वर्ल्ड कप गाजवला, पण निराश मनाने रोहित शर्मा, विराट कोहली मुंबईत दाखल, Video 

वर्ल्ड कप गाजवला, पण निराश मनाने रोहित शर्मा, विराट कोहली मुंबईत दाखल, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक १० सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला अंतिम फेरीत अपयशाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड कपच्या यशस्वी मोहिमेला सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला फायनलमध्ये कांगारूकडूनच हार मानावी लागली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर जवळपास ९५ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या फायनलमध्ये भारतीय संघावर आयत्यावेळी नशीब रुसले. आयसीसी स्पर्धांमध्ये नेहमीच दबदबा राखणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या नावावर तो दिवस होता. या पराभवानतंर भारतीय खेळाडूंच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते, मोहम्मद सिराज वगळता इतरांनी भावनांवर आवर घातला. पण, त्यांचे पाणावलेले डोळे वेदना सांगून जाण्यासाठी पुरेसे होते.


रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांच्या बॅटींतून धावांचा पाऊस या संपूर्ण स्पर्धेत पडला. विराटने सर्वाधिक ७६५ धावा स्पर्धेत. रोहितने ५९७, श्रेयस ५३०, लोकेस ४५२ व शुबमन गिल ३५० धावांसह स्पर्धा गाजवली होती. गोलंदाजीत मोहम्मद शमीने २४ विकेट्स, जसप्रीत बुमराह ( २०), रवींद्र जडेजा ( १६), कुलदीप यादव ( १५) व मोहम्मद सिराज ( १४) यांनी प्रतिस्पर्धींना हतबल केले होते. पण, अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. त्यांनी तिन्ही आघाड्यांवर भारतीय संघाच्या वरचढ खेळ केला, हे सत्य आता पाचवायला हवं.


२०११च्या वर्ल्ड कपपूर्वी चांगल्या फॉर्मात असूनही रोहितला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर २०२३च्या वर्ल्ड कपमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघ फायनलपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे त्याने हा वर्ल्ड कप जिंकावा अशी तमाम चाहत्यांची इच्छा होती. विराटने जीव तोडून खेळ केला, परंतु त्याच्या वाट्यालाही हे दुःख आल्याने चाहते हळहळले आहेत. मोहम्मद शमीच्या बाबतितही तेच घडले. हे अपयश पचवण्यासाठी भारतीय खेळाडूंना पुरेसा वेळ लागेल, परंतु ते पुन्हा नव्या दमाने उभे राहतील. आता भारतीय खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत आणि आज रोहित शर्माविराट कोहली कुटुंबासोबत मुंबईत दाखल झाले.



 

Web Title: Virat Kohli and Rohit Sharma return to Mumbai after the World Cup final in Ahmedabad, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.