Join us  

डोळ्यात साठवून ठेवावा असा क्षण! 'चॅम्पियन' रोहित-विराटची गळाभेट; Unseen Video Viral

रोहित शर्मा आणि विराट कोहलीची गळाभेट.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 2:58 PM

Open in App

Virat Kohli And Rohit Sharma Video : २०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघ मोठ्या कालावधीपर्यंत आयसीसी ट्रॉफीच्या प्रतिक्षेत होता. अखेर ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकून टीम इंडियाने तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. भारताला २००७ नंतर प्रथमच ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावता आला. या विजयासह कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला रामराम केले. आता हे तिघे ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये दिसणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवताना भारताने सात धावांनी सामना जिंकला. विजयानंतर रोहित शर्मासह सर्वच खेळाडू भावुक दिसले.

आता रोहित आणि विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विराट कोहली पॅव्हेलियनकडे परतत असताना पुढून रोहित शर्मा येतो. इथे या दिग्गजांनी गळाभेट घेऊन विजयाचा आनंद साजरा केला. तितक्यात मावळते मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड येतात आणि विराट-रोहितची पाठ थोपटतात. 

दरम्यान, विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने सात धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यासह तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. २०१३ नंतर भारताने प्रथमच आयसीसीचा किताब जिंकला आहे. भारताला वन डे विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, यावेळी रोहितसेनेने ट्रॉफीवर कब्जा केला. दरम्यान, २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. 

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्माट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघराहुल द्रविड