मुंबई : सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये भांडण झाल्याचे म्हटले जात आहे. या दोघांमध्ये सध्या विस्तवही जात नाही आणि त्यामुळेच रोहितला वेस्ट इंडिजमधील कसोटी सामन्यांमध्ये संधी दिली नाही, असे क्रिकेट चाहते म्हणत आहेत. पण आता तर कोहली आणि रोहितची पत्नी रितिका सचदेव हे एकत्र डेटिंगवर गेले होते, असे वृत्त आहे.
कोहली आणि रितिका यांचां संबंध २०१० सालापासून असल्याचे म्हटले झाले. २०१० साली रितिका आणि कोहली आयपीएलच्या पार्टीमध्ये भेटले होते. या पार्टीनंतर या दोघांची चांगली ओळख झाली. त्यानंतर तीन वर्षे ती कोहलीबरोबर दिसत होती. पण ही गोष्ट लोकांना मात्र माहिती नव्हती. पण एक गोष्ट अशी घडली की, हे दोघे एका डेटिंगवरर गेले आणि ते पकडले गेले. नेमकं असं घडलं तरी काय होतं...
कोहली आणि रितिका हे २०१० ते २०१३ या तीन वर्षांमध्ये एकत्र होते. त्यावेळी एकदा हे दोघेही सिनेमाच्या डेटिंगला गेले होते. त्यावेळी या दोघांना पाहिले गेले. कोहलीबरोबर असणारी ही मुलगी आहे तरी कोण, हा प्रश्न त्यावेळी बऱ्याच जणांना पडला होता. कारण त्यावेळी रितिका आपला कोहलीबरोबरचा फोटो कोणालाही काढायला देत नव्हती. पण अखेर या दोघांचे फोटो चांगलेच वायरल झाले आणि त्यानंतर ही रितिका असल्याचे सर्वांना समजले.
या तीन वर्षांनंतर रितिका कोहलीजबरोबर जास्त वेळा दिसली नाही. रितिका ही या तीन वर्षांमध्ये कोहलीच्या कंपनीमध्ये कामाला होती. कोहलीच्या कंपनीमध्ये तिच्याकडे स्पोर्ट्स टॅलेंट मॅनेजर हे पद होते. पण त्यानंतर रितिकाने आपली स्वत:ची एक कंपनी काढली आणि तिचा कोहलीच्या कंपनीबरोबरचा संबंध संपला.
कोहली आणि रोहित यांच्या भांडणाबद्दल शास्त्री काय म्हणाले, जाणून घ्या....शास्त्री हे सलग दुसऱ्यांदा भारताचे मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाले आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून शास्त्री हे विराट आणि रोहित या दोघांनाही ओळखतात. बरेच विजय आणि पराभव त्यांनी पाहिले आहेत. त्यामुळे संघातील विराट आणि रोहित यांच्यातील भांडणाबद्दल तेच अधिकारवाणीने बोलू शकतात.
वेस्ट इंडिजवरून परतल्यावर शास्त्री यांना विराट आणि रोहित यांच्यातील भांडणाबद्दल विचारण्यात आले. यावर शास्त्री म्हणाले की, " या प्रश्नाचे खरे उत्तर तुम्हाला देतो. विराट आणि कोहली यांच्यामध्ये भांडण असल्याची गोष्ट निराधार आहे. गेली पाच वर्षे मी दोघांना जवळून पाहतो आहे. विराट आणि रोहित यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण नाही."