Join us

हे बलिदान विसरता कामा नये; हंदवाडा चकमकीत शहीद जवानांना Virat Kohliसह क्रीडा विश्वातून मानवंदना

काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जवळपास 13 तास चाललेल्या चकमकीत कर्नल, मेजर आणि 3 जवान शहीद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 10:16 IST

Open in App

काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जवळपास 13 तास चाललेल्या चकमकीत कर्नल, मेजर आणि 3 जवान शहीद झाले. 44 वर्षीय कर्नल आशुतोष शर्मा 21 राष्ट्रीय रायफल्सच्या बटालियनचे कमांडिंग होते. शनिवारी सायंकाळी साडेपाचनंतर कमांडर मेजर अनुज सूद (30), नायक राजेश कुमार (29), लान्स नायक दिनेश सिंह ( 24) आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस उपनिरीक्षक सागीर पठाण उर्फ ​​काझी (41) हे त्याच्यासमवेत होते. त्यांनी घरात प्रवेश करून अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढले खरे; परंतु ते स्वतःला वाचवू शकले नाहीत. दहशतवाद्यांच्या गोळीबारात ते शहीद झाले. या  शहीदांना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली. तुमचे हे बलिदान विसरता कामा नेय, असे विराटनं ट्विट केलं.

''आपले धाडसी जवान शहीद झाल्याचं ऐकून प्रचंड दुःख झालं. या शूर जवानांच्या कुटुंबीयांसोबत मी आहे. हे जवान देशाचे खरे हिरो आहेत. तुमच्या या बलिदानाला माझा सलाम,''असे भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणनं ट्विट केलं. ''कोणत्याही परिस्थितित जे आपले कर्तव्य विसरत नाही, ते देशाचे खरे नायक आहेत. त्यांचे हे बलिदान विसरता कामा नये. हंदवाडा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसमोर मी नतमस्तक होतो. जय हिंद,'' असे विराटनं ट्विट केलं.   ''या सर्व भारतीय जवान आणि पोलिसांना माझा सलाम. तुमचे बलिदान आम्ही विसरणार नाही,'' युवराज सिंगनं हे ट्विट करून श्रंद्धांजली वाहिली.   गौतम गंभीरनं म्हटलं की,''देशाचे खरे नायक कोण? अभिनेता? खेळाडू? राजकारणी? यापैकी कुणीच नाही. जवान हेच आपले खरे नायक आहेत. त्यांच्या पालकांना सलाम.''  ''या जवानांचे पालक देवाचे रुप आहेत. त्यांना हात जोडून नमस्कार,'' असे वीरेंद्र सेहवाग म्हणाला.        

टॅग्स :विराट कोहलीभारतीय जवानविरेंद्र सेहवागयुवराज सिंगलोकेश राहुलइरफान पठाण